Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

IndiaNewsUpdate : द्वेषपूर्ण भाषणातून दंगल , सर्वोच्च न्यायालयाचा मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना मोठा दिलासा …

Spread the love

नवी दिल्ली : उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना 2007 साली यूपीच्या गोरखपूरमध्ये द्वेषपूर्ण भाषण दिल्याप्रकरणी मोठा दिलासा मिळाला आहे. सुप्रीम कोर्टाने या प्रकरणी निकाल देताना द्वेषपूर्ण भाषण दिल्याबद्दल त्याच्यावर कारवाई होणार नाही, असे म्हटले आहे. अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयाने मान्यता दिली आहे. सीएम योगी यांच्यावर खटला चालवण्याची परवानगी नाकारण्याच्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले होते.


2007 (गोरखपूर) दंगलीचा खटला यूपीचे मुख्यमंत्री योगी यांच्याविरोधात मागे घेण्यास आव्हान देणाऱ्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने आदेश राखून ठेवला होता. सीएम योगी यांच्या द्वेषपूर्ण भाषणामुळे दंगल उसळली, ज्यात 10 लोक मारले गेले, असा आरोप याचिकेत करण्यात आला होता. अलाहाबाद उच्च न्यायालयाने याचिका फेटाळल्यानंतर याचिकाकर्ते परवेझ परवाझ यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती.

21 ऑगस्ट 2018 रोजी सर्वोच्च न्यायालयाने मुख्यमंत्री योगी यांचा समावेश असलेले 2007 मधील गोरखपूर दंगल प्रकरण हटविण्याला आव्हान देणाऱ्या याचिकेवर उत्तर प्रदेश सरकारकडून उत्तर मागवले होते. तत्कालीन सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांच्या खंडपीठाने नोटीस बजावली होती आणि राज्य सरकारकडून चार आठवड्यांत उत्तर मागितले होते. आज झालेल्या सुनावणीदरम्यान योगी यांच्या बाजूने उपस्थित असलेले ज्येष्ठ वकील मुकुल रोहतगी म्हणाले की, ट्रायल कोर्टाने क्लोजर रिपोर्ट स्वीकारला आहे. जो अलाहाबाद हायकोर्टाने कायम ठेवला आहे. केवळ ती व्यक्ती मुख्यमंत्री आहे म्हणून मेलेल्या घोड्याला चाबूक मारण्याचा हा प्रयत्न आहे. रेकॉर्डवर कोणताही पुरावा  नाही.

सीएम योगी आदित्यनाथ यांच्या वतीने मुकुल रोहतगी यांनी ही याचिका जड दंडासह फेटाळण्यात यावी, असा युक्तिवाद केला होता. दुसरीकडे, कपिल सिब्बल यांनी 2007 मधील गोरखपूर दंगल आणि योगींच्या वक्तव्यावरून झालेल्या वादात युक्तिवाद करण्यास नकार दिला होता.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!