Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

IncomeTaxRaidUpdate : खळबळजनक : “ते” वऱ्हाडी बनून आले , “त्यांनी” शोधले आणि तब्बल ३९० कोटींचा ऐवज घेऊन गेले !!

Spread the love

जालना : गेल्या काही दिवसांपूर्वी पश्चिम बंगालमधील मंत्र्याच्या मैत्रिणीच्या घरात सापडलेल्या ५० कोटींच्या घबाडाची देशभर चर्चा चालू असतानाच जालना आणि औरंगाबाद शहरातील आयकर विभागाने टाकलेल्या धाडीत तब्बल ३९० कोटींचे बेहिशोबी दाग दागिने आणि रोख रक्कम जप्त केल्यामुळे खळबळ उडाली आहे. स्टील कारखानदार, भंगार विक्रेते , कपडे व्यापारी, बांधकाम व्यावसायिक आणि उद्योजकांवरील या धाडी असल्याचे वृत्त असून गेल्या ८ दिवसांपासून अत्यंत  गुप्तपणे हि कारवाई चालू असल्याने कुणाला याची भनकही लागू देण्यात आली नाही. विशेष म्हणजे या नोटा मोजताना अक्षरशः नोटांची भिंत उभी राहिली होती.


या धाडींविषयी अधिक माहिती अशी कि , आयकर रिटर्न्स भरण्याची अंतिम तारीख ३१ जुलै संपताच आयकर विभागाने हि मोहीम हातात घेऊन हि मोठी कारवाई केली. सांगण्यात येते कि , ” दुल्हन हम ले जायेंगे..” असे स्टिकर लावून शंभराहून अधिक गाड्या आणि आयकर विभागाचे अडीचशेहून अधिक वऱ्हाडी जालना शहरात कोणाच्याही ध्यानी मनी नसताना दाखल झाले आणि पाच ठिकाणी धाडी टाकल्या.  नाशिक, पुणे, ठाणे व मुंबईच्या अधिकाऱ्यांचा यात समावेश होता.

याची धाडींची पार्श्वभूमी अशी आहे कि , गेल्या काही महिन्यांपूर्वी  जीएसटीच्या नाशिक येथील पथकाने आठवडाभर जालन्यात तळ ठोकून तपासणी केली होती. त्यातून या बेहिशोबी ऐवजाचा संशय जीएसटी अधिकाऱ्यांना आल्यामुळे जीएसटी आणि आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी अत्यंत गुप्तपणे हि मोहीम आखल्याचे सांगण्यात येत आहे. मागील वर्षीही सप्टेंबर महिन्यात जालन्यातील ४ मोठ्या स्टील उत्पादकांच्या घरी आणि कंपन्यांवरही छापे टाकण्यात आले होते. त्यातही , रोकड, दागिने यांसह ३९० कोटी रुपयांची बेहिशोबी मालमत्ता जप्त करण्यात आल्याचे प्राप्तीकर विभागाने जारी केलेल्या निवदेनात म्हटले होते.

नोटांच्या उभ्या राहिल्या भिंती…

या कारवाईत जप्त करण्यात आलेली रक्कम भारतीय स्टेट बँकेत नेऊन मोजताना तब्बल १३ तास लागल्याचे सांगण्यात येत आहे. जालन्यातील स्टील एसआरजे स्टील, कालिका स्टील, एक सहकारी बँक आणि खासगी फायनान्सर विमलराज सिंघवी, डिलर प्रदीप बोरा यांच्या व्यापारी प्रतिष्ठानवर प्राप्तीकर विभागाने ही कारवाई केली आहे. औरंगाबादेतील व्यापाऱ्यांची नावे मात्र समजू शकली नाहीत.  जप्त केलेल्या रक्कमेत ५८ कोटी रोख, १६ कोटींचे सोन्याचे दागिने, हिरे अशी एकूण ३९० कोटींची हि बेहिशेबी मालमत्ता असल्याचे वृत्त आहे. विशेष म्हणजे या नोटा मोजताना अक्षरशः नोटांची भिंत उभी राहिली होती.

हि कारवाई यशस्वी करण्यासाठी आयकर खात्याने पाच प्रमुख पथके  तयार केली होती. प्रारंभी या पथकांनी संबंधित स्टील व्यावसायिकांच्या घरांवर छापे टाकले, तेव्हा त्यांच्या हाताला फार काही लागले नाही मात्र  त्यानंतर प्राप्तीकर खात्याच्या पथकांनी आपला मोर्चा शहराबाहेरील फार्म हाऊसकडे वळवला. तेव्हा त्यांना अधिकाऱ्यांना कपाटांखाली, बिछान्यांमध्ये तसेच अडगळीतील काही पिशव्यांत रोकड लपवून ठेवल्याचे आढळून आले. इतक्या मोठ्या प्रमाणात पैसे सापडल्याने आयकर खात्याचे अधिकारीही चक्रावून गेले आहेत. नवीन एमआयडीसी मधील तीन रि-रोलिंग मिल आणि त्यांच्याशी निगडित आर्थिक व्यवहारांची तपासणी केली. यामध्ये औरंगाबादमधील एका प्रख्यात लँड डेव्हलपर आणि व्यापाऱ्याचाही समावेश आहे. 

जालन्यातील चार मोठ्या स्टील कारखानदारांनी कोट्यवधी रुपयांचे जादा उत्पन्न व्यवहारातून मिळवले आणि हे व्यवहार रोखीत केले, याची माहिती रेकॉर्डवर आणली नाही. त्यामुळे आयकर विभागाने अत्यंत गुप्तपद्धतीने हा छापा टाकला. या धाडीत कपाटाखाली, बिछान्यामध्ये नोटांची बंडलं सापडली. त्याचबरोबर सोन्याचे दागिने , सोन्याची  बिस्किटे, विटा, नाणी आणि हिरे मिळाले. याशिवाय आयकर विभागाने या व्यापाऱ्यांची घरे, कार्यालयांतून वेगवेगळ्या ठिकाणी असलेल्या जमिनी, शेती, बंगले यांसह बँकांतील ठेवी, इतर व्यवहारांशी संबंधित कागदपत्रे जप्त केली.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!