AurangabadNewsUpdate : माजी माहिती आयुक्त दिलीप धारूरकर यांचे निधन

औरंगाबाद : राज्याचे माजी माहिती आयुक्त दीलिप धारूरकर यांचे आज दीनांक १ आॅगस्ट २०२२ रोजी दुपारी १ वाजता निधन झाले. ते ६० वर्षांचे होते. डॉ. हेडगेवार रुग्णालयात त्यांच्यावर उपचार चालू होते. सायंकाळी ५ वाजता त्यांच्या पार्थिवावर प्रताप नगर येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येतील.
सचिन-स्वप्निल अपार्टमेंट, दशमेश नगर, ज्योतीनगर येथील त्यांच्या निवासस्थानावरून अंत्ययात्रा निघणार असल्याचे त्यांच्या निकटवर्तीयांनी कळविले आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या वृत्तपत्र विद्या विभागाचे माजी विभाग प्रमुख डॉ. वि. ल. धारूरकर यांचे ते लहान बंधू होते. दैनिक देवगिरी तरुण भारतचे संपादक म्हणून त्यांनी काम पाहिलेले आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशीही ते निगडित होते.