WorldNewsUpdate : श्रीलंका : जीवनावश्यक वस्तूंचे भाव पाहा , तुमचेही डोके गरगरेल …!!!

कोलंबो : श्रीलंकेतील जनजीवन विस्कळीत झाले असून श्रीलंकन नागरिकांच्या उद्रेकाच्या बातम्या आपण वाचत आहात. हा उद्रेक लाक्षात घेऊन जीव वाचविण्यासाठी श्रीलंकेच्या पंतप्रधानांनी आणि राष्ट्रपतींनी घर , दार सोडून पळ काढला आहे. यामागे एकमेव कारण म्हणजे श्रीलंकेची हाताबाहेर गेलेली आर्थिक परिस्थिती. दरम्यान संतप्त लोकांना नियंत्रणात आणण्यासाठी आता लष्कराने पुढाकार घेतला असून या देशात हळू हळू शांतता प्रस्थापित करण्याचे प्रयत्न होत आहेत. शेजारी राष्ट्र म्हणून भारतानेही श्रीलंकेला मदतीचा हात दिला आहे.
श्रीलंकेतील अस्थिरतेचे सर्वात मोठे कारण म्हणजे तेथील सरकारची आर्थिक धोरणे. सरकारच्या चुकीच्या आर्थिक निर्णयांचा परिणाम असा झाला की, देशातील अन्नधान्य आणि रेशनच्या सामान्य वस्तू अंदाधुंद महागाईच्या गर्तेत सापडल्या आहेत.
जगणे , खाणे-पिणे झाले कठीण …
दरम्यान लोकांना खाणे-पिणे कठीण झाले, परिणामी सरकारचा विरोध वाढला आणि आता अस्थिरतेचे वातावरण आहे. रेशनच्या तुटवड्यामुळे श्रीलंकेची 20 दशलक्ष लोकसंख्या रस्त्यावर आली आहे. तांदूळ निर्यातदार श्रीलंका सध्या त्याची आयात करत असून त्याची किंमत 450 ते 700 रुपये आहे. बटाटा-कांद्यासारख्या सामान्य भाजीचा भाव 220 रुपये किलो झाला आहे, तर लसूणही केवळ 250 ग्रॅम 170 रुपयांना मिळत आहे.
नारळ आणि खोबरेल तेलाचा सर्वात मोठा उत्पादक असलेल्या श्रीलंकेत या दिवसात नारळाचा भाव 85 ते 100 रुपयांवर पोहोचला आहे. तर खोबरेल तेलाला 600 ते 1000 रुपये प्रतिलिटर दर मिळत आहे. राजमा 925 रुपये किलो, पॉपकॉर्न 760 रुपये किलो, मसूर डाळ 500 रुपयांवरून 600 रुपये किलोवर पोहोचली आहे.
डाळी खाणेही झाले महाग, मूग डाळ 1240 रुपये किलो
काबुली हरभराही महाग झाला आहे. येथे हिरवा वाटाणा 355 रुपये किलो, काबुली हरभरा 800 रुपये किलो, हिरवा मूग 850 रुपये किलो, लाल राजमा 700 रुपये आणि काळ्या हरभऱ्याला 630 रुपये किलो दर मिळत आहे. संकटाच्या काळात वाटाणा, हरभरा या डाळींचे भाव वाढले आहेत. वाटाणा डाळ 500 रुपये किलो तर हरभरा डाळही 500 रुपये किलोपेक्षा जास्त भाव मिळत आहे. श्रीलंकेत मूग डाळीची किंमत आता सर्वसामान्यांच्या खिशातून गेली आहे. येथे मूग डाळ 1240 किलो दराने विकली जात आहे. त्यामुळे हीच तूर डाळ 890 रुपये किलोवर पोहोचली आहे.मुगाचा भाव 760 रुपये किलो, तर उडदाचा दर 850 रुपये किलोवर पोहोचला आहे.
विशेष म्हणजे या रेशनच्या या किमती श्रीलंकेच्या घाऊक बाजारातील किमतीवर आधारित आहेत. तर किरकोळ दुकानात त्यांची किंमत 10 ते 20% वाढवण्यात येत आहे.