Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

MaharashtraNewsUpdate : राष्ट्रपती पदाची निवडणूक ही वैचारिक लढाई , शिवसेनेच्या निर्णयावर काँग्रेसची प्रतिक्रया …

Spread the love

“राष्ट्रपती पदाची निवडणूक ही वैचारिक लढाई आहे. लोकशाही आणि संविधान रक्षणासाठी सुरू असलेला हा संघर्ष आहे. स्त्री, पुरुष किंवा आदिवासी, बिगर आदिवासी अशी ही लढाई नाही. जे संविधान आणि लोकशाहीच्या संरक्षणाच्या बाजूने आहेत ते सर्व यशवंत सिन्हा यांना पाठिंबा देत आहेत.” : बाळासाहेब थोरात 


मुंबई : शिवसेनेचे पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी  एनडीएच्या राष्ट्रपतीपदाच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांना पाठींबा जाहीर केला आहे. पाठींबा जाहीर करताना आमच्यावर कोणताही दबाव नसल्याचे उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केलं आहे. या निर्णयावर  महाविकासआघाडीतील घटक पक्ष असलेल्या काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांनी तीव्र  प्रतिक्रिया दिली आहे. 

शिवसेना महाविकास आघाडीत आहे, पण राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत एनडीएच्या उमेदवाराला निर्णय घेताना त्यांनी आमच्याशी काहीही चर्चा केलेली नाही, अशी खंत काँग्रेस नेते आणि माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केली. गैरलोकशाही मार्गाचा अवलंब करून राज्यातील महाविकास आघाडी सरकार पाडले गेले, शिवसेनेच्या अस्तित्वाला आव्हान दिले गेले, अशा परिस्थितीत शिवसेनेने घेतलेली भूमिका अनाकलनीय आहे, असे थोरात यांनी म्हटले आहे.

याबाबत त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे कि , राष्ट्रपतीपदाची निवडणूक ही वैचारिक लढाई आहे. लोकशाही आणि संविधान रक्षणासाठी सुरू असलेला हा संघर्ष आहे. स्त्री, पुरुष किंवा आदिवासी, बिगर आदिवासी अशी ही लढाई नाही.जे संविधान आणि लोकशाहीच्या संरक्षणाच्या बाजूने आहेत ते सर्व यशवंत सिन्हा यांना पाठिंबा देत आहेत, असे असताना  शिवसेनेने द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा का दिला? त्यासाठी त्यांनी काही कारणही सांगितले, मात्र त्या पाठीमागील त्यांची खरी भूमिका काय ते शिवसेनेचे नेतृत्वच सांगू शकेल, त्याबद्दल आम्ही काय सांगणार? असे थोरात म्हणाले.

शिवसेना हा एक वेगळा राजकीय पक्ष आहे, त्यामुळे ते त्यांची भूमिका घेऊ शकतात. मात्र या वैचारिक लढाईत जेव्हा गैर लोकशाही मार्गाचा अवलंब करून राज्यातील सरकार पाडले गेले, शिवसेनेच्या अस्तित्वाला आव्हान दिले गेले, अशा परिस्थितीत शिवसेनेने घेतलेली भूमिका अनाकलनीय आहे. शिवसेना महाविकास आघाडीत आहे, पण हा निर्णय घेताना त्यांनी आमच्याशी काहीही चर्चा केलेली नाही, असेही थोरातांनी स्पष्ट केले..

  • महानायक ऑनलाईनची वर्गणी भरून “महानायक”ला सपोर्ट करा. 

वार्षिक Rs. 999/
मासिक Rs. 99/-
किंवा आपल्या इच्छेनुसार …

PhonePay / GooglePay साठी …
9421671520
डेबिटकार्ड , क्रेडिटकार्ड आणि ऑनलाईन बँकींगसाठी…
https://www.instamojo.com/@mahanayakonline/

 

आपलं सरकार

Click to listen highlighted text!