Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

IndiaNewsUpdate : उत्तराखंडच्या तीन वरिष्ठ काँग्रेस नेत्यांनी केला “आप” मध्ये प्रवेश

Spread the love

डेहराडून : उत्तराखंड प्रदेश काँग्रेसच्या (काँग्रेस) तीन वरिष्ठ नेत्यांनी सोमवारी पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा देऊन आम आदमी पक्षात (आप) प्रवेश केला. दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया, उत्तराखंड काँग्रेसचे प्रवक्ते राजेंद्र प्रसाद रातुरी, राज्य महिला काँग्रेसचे उपाध्यक्ष कमलेश रमण आणि पक्षाचे सोशल मीडिया सल्लागार कुलदीप चौधरी यांच्या उपस्थितीत दिल्लीत आम आदमी पक्षात प्रवेश केला.

उत्तराखंड आपचे संयोजक जोतसिंग बिश्त यांनी सांगितले की, सिसोदिया यांनी त्यांच्या प्रवेशावर आनंद व्यक्त केला आणि त्यांच्या येण्याने पक्ष मजबूत होईल असे सांगितले. विधानसभा निवडणुकीत पराभव झाला असला तरी काँग्रेसमधील वाढत्या गटबाजीला कंटाळून आपण राजीनामा दिला असल्याचे म्हटले आहे.

काँग्रेस नेत्यांच्या राजीनाम्याची बातमी समजताच पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी माजी कॅबिनेट मंत्री हरकसिंग रावत यांच्या घरी बैठक घेऊन पक्षातील अंतर्गत परिस्थितीवर चिंता व्यक्त केली. मात्र, माजी मुख्यमंत्री आणि पक्षाचे सरचिटणीस हरीश रावत मात्र त्यापासून दूर राहिले.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!