WorldNewsUpdate : प्राणघातक हल्ल्यात गंभीर जखमी शिंजो आंबे यांचे निधन

टोकियो : प्राणघातक गोळीबारात गंभीर जखमी झालेले जपानचे माजी पंतप्रधान शिंजो आबे यांचे उपचारादरम्यान निधन झाले असल्याचे वृत्त आहे. जपानी वृत्तसंस्था एनएचकेच्या हवाल्याने रॉयटर्सने आबे यांचे निधन झाल्याचं म्हटले आहे. सकाळी आबे हे एका सभेत भाषण देत असताना त्यांच्यावर एका अज्ञात हल्लेखोराने गोळीबार केला होता. या हल्ल्यात गंभीर जखमी झाल्यामुळे आबे यांच्यावर उपचार सुरु होते. मात्र डॉक्टारांनी अनेक प्रयत्न करुनही त्यांची मृत्यूशी सुरु असणारी झुंज पाच तासांनी संपली. भारतीय वेळेनुसार दुपारी १ वाजून ३३ मिनिटांनी म्हणजेच हल्ल्यानंतर दोन तासांनी आबे यांचा मृत्यू झाल्याची माहिती नारा मेडिकल युनिव्हर्सिटी हॉस्पीटलच्या डॉक्टरांनी दिली आहे.
Japan's former Prime Minister Shinzo Abe has died, public broadcaster NHK said https://t.co/nTJOjHzAK7 pic.twitter.com/2h4v92e6Ha
— Reuters (@Reuters) July 8, 2022
“आबे यांच्या एलडीपी (लिब्रल डेमोक्रॅटीक पार्टी) पक्षाच्या अधिकाऱ्यांनी कासीहारा शहरातील रुग्णालयामध्ये आबे यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची माहिती दिली आहे. ते ६७ वर्षांचे होते,” असे एनएचकेने म्हटले आहे. आबे यांच्या मानेजवळ गोळी लागली होती. त्यांच्या शरीरावर गोळीमुळे झालेल्या दोन जखमा होत्या. अती रक्तस्त्राव झाल्याने आबे यांचा मृत्यू झाल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे.
पंतप्रधानांकडून तीव्र निषेध
त्यांच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी सांगितले की, गोळी त्याच्या हृदयाला लागल्याने हृदयात मोठे छिद्र झाले होते. तसेच त्याच्या मानेवर दोनदा गोळी झाडण्यात आली होती.” निवडणूक प्रचार सोडून टोकियोला परतलेले जपानचे पंतप्रधान फुमियो किशिदा म्हणाले की, हे कृत्य करणाराला माफ केले जाऊ शकत नाही. मी याचा तीव्र निषेध करतो. २०२१ मध्ये भारत सरकारने शिंजो आबे यांना पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित केलं होतं.
एएफपी या वृत्तसंस्थेनुसार, जपानचे अधिकृत चॅनेल एनएचके आणि जीजी (जीजी न्यूज एजन्सी) यांनी माजी पंतप्रधान शिंजो आबे यांच्या मृत्यूची पुष्टी झाल्याचे वृत्त दिले आहे. जपानच्या लिबरल डेमोक्रॅटिक पार्टीच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, माजी पंतप्रधान शिंजो आबे यांचे नारा भागातील काशिहारा शहरात निधन झाले.
I am shocked and saddened beyond words at the tragic demise of one of my dearest friends, Shinzo Abe. He was a towering global statesman, an outstanding leader, and a remarkable administrator. He dedicated his life to make Japan and the world a better place.
— Narendra Modi (@narendramodi) July 8, 2022
भारतात एक दिवसाचा राष्ट्रीय दुखवटा
पंतप्रधान पीएम मोदी यांनी ट्विट करून जपानचे माजी पंतप्रधान शिंजो आबे यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे. आपल्या ट्विटमध्ये मोदी यांनी म्हटले आहे की, “माझ्या सर्वात जिवलग मित्रांपैकी एक शिंजो आबे यांच्या दुःखद निधनाने धक्का बसला आहे. माझे दुःख शब्दात व्यक्त करणे शक्य नाही. शिंजो आबे हे एक महान जागतिक राजकारणी आणि एक महान नेते होते, तसेच प्रशासक म्हणून त्यांनी अप्रतिम भूमिका बजावली. जपान आणि जगाला एक चांगले स्थान बनवण्यासाठी त्यांनी आपले जीवन समर्पित केले.” दरम्यान जपानचे माजी पंतप्रधान शिंजो आबे यांच्या निधनाबद्दल पंतप्रधान मोदींनी एक दिवसाचा राष्ट्रीय शोक जाहीर केला आहे.
असा नेता झाला नाही …
जपानच्या राजकारणावर लक्ष ठेवणारे कानागावा विद्यापीठाचे प्राध्यापक कोरी वॉलेस यांनी यापूर्वी सांगितले होते की, जपानच्या राजकारणात गेल्या ५०-६० वर्षांत असा नेता झाला नाही. शेवटच्या वेळी अशी घटना १९६० मध्ये घडली होती जेव्हा जपान सोशलिस्ट पार्टीच्या इनजिरो असानुमा यांना उजव्या विचारसरणीच्या तरुणाने भोसकले होते.
सरकारचे प्रवक्ते हिरोकाझू मात्सुनो यांनी यापूर्वीच्या वृत्तांना सांगितले होते की, “शिंजो आबे यांच्यावरील हल्ला देशाच्या पश्चिमेकडील नारा भागात दुपारी १२ वाजण्याच्या आधी झाला. भारतीय वेळेनुसार सकाळी साडेआठ वाजता वाजता घडली. या प्रकरणी एका शूटरला अटक करण्यात आली आहे.”
६७ वर्षीय अबे सुरक्षा दलांच्या उपस्थितीत भाषण देत होते, आणि प्रेक्षक त्यांच्यापर्यंत सहज पोहोचू शकत होते. जपानच्या सरकारी टीव्ही एनएच केने प्रसारित केलेल्या फुटेजमध्ये तो मोठ्या आवाजात आणि धूर हवेत उठताना स्टेजवर उभा असल्याचे दाखवले आहे.