Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

CongressNewsUpdate : गैरहजर राहिलो म्हणून असे काय झाले ? अशोक चव्हाण यांचा सवाल …

Spread the love

नवी दिल्ली : महाराष्ट्रातील विश्वासदर्शक ठरावादरम्यान काँग्रेस आमदारांच्या गैरहजेरीवर कारवाई होणार असल्याचे सांगितले जात आहे. यावर महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण म्हणाले की, मला आश्चर्य वाटते की, छोट्याशा प्रकरणावरून विनाकारण “बवाल ” निर्माण करण्यात येत आहे. ते म्हणाले की, सभापती निवडीच्या एक दिवस आधी आम्ही भाजपच्या विरोधात मतदान केले होते, मग २४ तासात असे काय काय होऊ शकते ?

आपण गैरहजर असल्याच्या खुलाशावर बोलताना अशोक चव्हाण म्हणाले की, विश्वासदर्शक ठरावाच्या दिवशी आम्हाला काही मिनिटे उशीर झाला आणि स्पीकरच्या घोषणेनंतर सभागृहाचे दरवाजे बंद झाले. आम्ही लॉबीत अडकलो आणि त्याच वेळी आम्ही आमचे आमचे पत्रही  स्पीकरला पाठवले.

खरे तर माझ्यासारख्या ज्येष्ठ नेत्याबाबत असा प्रश्न उपस्थित करणे चुकीचे असल्याचे माजी मुख्यमंत्री म्हणाले. मी वर्षानुवर्षे काँग्रेससाठी पूर्ण निष्ठेने काम करत आहे. त्यामुळे माझ्या सचोटीवर कुणालाही शंका नसावी. हे हायकमांडलाही कळते, असेही ते म्हणाले. त्यामुळेच यात शंका नाही, असेहि अशोक चव्हाण म्हणाले.

दरम्यान विधानपरिषद निवडणुकीत ज्या सात लोकांनी क्रॉस  व्होटिंग केले त्या सात जणांवर कडक कारवाई करावी, असे मी यापूर्वीही म्हटले आहे, असेही अशोक चव्हाण म्हणाले. माझी पक्षाबाबत नाराजी नाही, आणि पक्षाबाबत कोणाची काही नाराजी असेल, तर त्यासाठी संवादाचा मार्ग आहे, त्यामुळे संवादाच्या माध्यमातूनच  नाराजी दूर केली पाहिजे , असेही ते म्हणाले.

एका प्रश्नाच्या उत्तरात अशोक चव्हाण म्हणाले की, अजूनही महाविकास आघाडी युती आहे, आम्ही सर्व एकत्र आहोत. दुसरीकडे, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका एकत्र लढविण्याबाबत ते म्हणाले की, याबाबत महाराष्ट्र काँग्रेस कमिटी जो निर्णय घेईल, तो आम्हाला मान्य असेल.

अशोक चव्हाण म्हणाले की, महाराष्ट्रात ज्या प्रकारे राजकीय पेचप्रसंग निर्माण झाला, हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात असून, ११ जुलै रोजी होणाऱ्या सुनावणीत आणखी अनेक गोष्टी स्पष्ट होतील. त्यामुळे ते पुढे म्हणाले कि , नाना पटोले आता राष्टीय प्रवक्ते  तरीही हे योग्य कि अयोग्य हे त्यांनाच विचारा.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!