Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

CongressNewsUpdate : अशोक चव्हाण यांच्यासह ९ आमदारांना करणे दाखवा नोटीस …

Spread the love

मुंबई : विधानसभेतील विश्वासदर्शक ठरावाच्या वेळी काँग्रेसचे ११ आमदार गैरहजर होते. यापैकी ९ आमदारांना पक्षाने कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. यात माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांचाही समावेश आहे.

राज्याचे नवे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरील विश्वासदर्शक ठरावावर सकाळी ११ वाजता मतदानास सुरुवात झाली होती. यावेळी आपल्या सर्व आमदारांची सभागृहात आमदारांची उपस्थिती राहील याची खबरदारी सर्वच पक्षनि घेतली होती. काँग्रेसच्या वतीनेही सर्व आमदारांना उपस्थित राहण्यासंबंधी व्हीप बजावला होता तरीही  काँग्रेसचे नेते अशोक चव्हाण, विजय वडेट्टीवार, झिशान सिद्दिकी, धीरज देशमुख आदी आमदार विलंबाने सभागृहावर पोहोचले मात्र उशिरा आल्याने त्यांना बाहेर लॉबीतच थांबावे लागले. मतदानाची प्रक्रिया पूर्ण होताच विरोधकांची मते अध्यक्षांच्या निवडणुकीच्या तुलनेत कमी पडल्याने कोण गैरहजर आहे, याचा आढावा घेण्यात आला तेंव्हा काँग्रेसचे नऊ आमदार वेळेत पोहोचू शकले नव्हते तर दोन जण आमदार पूर्वकल्पना देऊन गैरहजर होते.

काँग्रेसच्या या आमदारांची अनुपस्थिती लक्षात घेता सभागृहात बोलताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्यांनी ‘ विश्वासदर्शक प्रस्तावाच्यावेळी अनुपस्थित राहून अप्रत्यक्षपणे आम्हाला मदत करणाऱ्या अदृश्य हातांचा आभारी आहे, असे विधान करीत खिल्ली उडविल्यामुळे काँग्रेसवॉर टीका होत आहे. मात्र, आता या संदर्भात पक्षाकडून आमदारांना जाब विचारण्यात आला आहे. त्याही पेक्षा महत्वाचे म्हणजे विधान परिषदेच्या निवडणुकीच्यावेळी तीन आमदारांची मते फुटली होती. मात्र त्यावर चर्चा होण्याआधीच शिवसेनेचे आमदार फुटल्याने हि चर्चा मागे पडली. आता या सर्व मुद्यांची चर्चा काँग्रेस नेतृत्वाला करावी लागणार आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!