Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

MaharashtraPolticalCrisis : मोठी बातमी : महाविकास आघाडी सर्वोच्च न्यायालयात , आधी म्हणाले अफवा , आज आदेश कि, उद्याच बहुमत सिद्ध करा ….

Spread the love

मुंबई : राज्यात सत्ता संघर्षाच्या हालचाली आत तीव्र झाल्या आहेत. गेल्या ९ दिवसांपासून राज्यात राजकीय नाट्य रंगले होते. शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे आणि त्यांचे समर्थक सेनेतून बाहेर गेल्यामुळे महाविकास आघाडी अल्पमतात आल्याचे पत्र  काल रात्री विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी देताच रातोरात पत्र तयार करून उद्याच बहुमत चाचणीला सामोरे जा असे आदेश मुखमंत्री उद्धव ठाकरे यांना दिले आहेत . या फ्लोअर चाचणी चाचणीच्या विरोधात महाविकास आघाडीने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे.


विशेष म्हणजे राज्यपालांनी ३० तारखेलाच महाविकास आघाडीला बहुमत सिद्ध करण्याचे आदेश दिले असल्याचे पत्र सर्वच वृत्त वाहिन्यांवर दाखवले जात होते जेंव्हा भाजप नेते आपल्या दिल्ली दौऱ्यावरून परत आल्यानंतर राज्यपालांना भेटायला गेले होते याचा अर्थ हि तारीख आणि हे पत्र आधीच कसे फुटले हा एक प्रश्नच आहे मात्र ते पत्रच फेक असल्याचे राज्यपाल भावनाकडून स्पष्ट करण्यात आले मात्र आता ती अफवाच खरी असल्याचे दिसत आहे. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी राज्याचे मुख्य सचिव आणि मुख्यमंत्री कार्यालयाला पत्र पाठवून उद्याच म्हणजेच ३० जून रोजी घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

महाराष्ट्रात फ्लोअर टेस्ट घेण्याच्या गदारोळात शिवसेनेने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना बहुमत सिद्ध करण्याच्या राज्यपालांच्या आदेशाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले आहे. महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी गुरुवारी ठाकरे सरकारला विधानसभेत बहुमत सिद्ध करण्याचे आदेश दिले आहेत. त्यांनी विधानसभेचे सचिव राजेंद्र भागवत यांना पत्र लिहून सकाळी ११ वाजता सभागृहाचे विशेष अधिवेशन बोलावण्याची विनंती केली आहे.

राजभवनला २८ जून रोजी सात अपक्ष आमदारांनी पाठवलेला ई-मेल आणि विरोधी पक्षाकडूनही सरकारने  बहुमत गमावला असल्याचा दावा करण्यात आल्यामुळे राज्य सरकारने आपले  बहुमत सिद्ध करावे  अशा सूचना करण्यात येत असल्याचे  राज्यपालांनी लिहिलेल्या पत्रात नमूद करण्यात आलं आहे. गुरुवार ३० जून रोजी सकाळी ११ वाजता विधानसभेत बहुमत चाचणी घेण्यात यावी असं राज्यपालांनी पत्रात नमूद केलं आहे. विशेष म्हणजे उद्याच्या बहुमत चाचणीसाठी राज्यपालांनी ६ अटी घालून दिल्या आहेत.

राज्यपालांनी घातलेल्या अटी

१. राज्याच्या विधान भवनाचे  विशेष अधिवेशन उद्या गुरुवार ३० जून २०२२ रोजी सकाळी ११ ते संध्याकाळी ५ वाजेपर्यंत आयोजित केले  जावे . यात फक्त सरकारच्या बहुमत चाचणीची प्रक्रिया घेतली जावी. इतर कोणताही अजेंडा असू नये. तसेच बहुमत चाचणीची प्रक्रिया संध्याकाळी पाच वाजेपर्यंत पूर्ण करावी.

२. राज्यातील काही नेत्यांकडून करण्यात आलेल्या आक्रमक वक्तव्यांच्या पार्श्वभूमीवर विधान भवनाच्या परिसरात कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात यावा. तसंच संपूर्ण प्रक्रियेवेळी कायदा आणि सुव्यवस्था राखली जाईल याची संपूर्ण काळजी घेतली जावी.

३. बहुमत चाचणीच्या प्रक्रियेचं लाइव्ह टेलिकास्ट केलं जावं आणि त्यासाठीची सर्व व्यवस्था उपलब्ध केली जावी.

४. मतदानाची प्रक्रिया पारदर्शक व्हावी यासाठी मतमोजणी शिरगणती पद्धतीनं घ्यावी. यात प्रत्येक सदस्याला त्याच्या जागेवर उभं राहून त्याची गणती केली जावी आणि सदस्याच्या जागेवर जाऊन त्याची मोजणी केली जावी.

५. विशेष अधिवेशनाची संपूर्ण प्रक्रिया आणि बहुमत चाचणी उद्याच पूर्ण केली जावी. अधिवेशन कोणत्याही पद्धतीनं स्थगित करता येणार नाही.

६. उद्याच्या संपूर्ण अधिवेशनाचे स्वतंत्र एजन्सीच्या माध्यमातून व्हिडिओ रेकॉर्डिंग केले  जावे  याची जबाबदारी विधानसभेच्या सचिवांची राहील. याचे  संपूर्ण फुटेज माझ्याकडे सुपूर्द करावे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!