Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

MaharashtraPoliticalCrisis : शिंदे गटाला “खुल्लम खुल्ला” प्यार करण्याशिवाय पर्याय नाही…

Spread the love

मुंबई : राज्याचे राजकारण सध्या चहूबाजूला फिरत आहे. एकीकडे आमचा काही संबंध नाही म्हणत भाजप नेते चोरी छुपे सेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे आणि त्यांच्यासोबत असणाऱ्या आमदारांचा पाहुणचार करीत आहेत , हवा -हवाई दौरे करून त्यांना भेटत आहेत , त्यांच्याशी चर्चा करीत आहेत मात्र कुठल्याही निष्कर्षाप्रत येण्यास तयार नाहीत. त्यामुळे शिंदे आणि त्यांचे सहकारी काय निर्णय घ्यावा यावर आपल्या पाठिराख्यांशी हितगुज करीत आहेत अशाच अर्थाने त्यांनी मनसेचे नेते राज ठाकरे यांच्याशी चर्चा केल्याने राजकीय वर्तुळात आणखी नव्या चर्चेला तोंड फुटले आहे. शेवटी काहीही असले तरी सर्व खेळ आता भाजपच्या हातात आहे. पण या सर्व पार्श्वभूमीवर शिंदे गटालाही आता कोणत्याही एकाशी “खुल्लम खुल्ला” प्यार करण्याशिवाय पर्याय नाही…


दरम्यान हे फोन वृत्त बाहेर पडताच ,  राज ठाकरे यांच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठीच एकनाथ शिंदे यांनी त्यांना फोन केल्याची चर्चा आता जोर धरत आहे . या दोन्ही नेत्यांमध्ये बराच वेळ फोनवर चर्चा झाल्याची माहिती  “आज तक ”  या हिंदी वृत्त वाहिनीने दिली आहे. विशेष म्हणजे रुग्णालयात उपचार घेऊन घरी परतलेल्या राज ठाकरेंनी अद्याप शिवसेनेतील फाटाफुटीवर अद्याप कुठलीही प्रतिक्रिया दिलेली नाही. आता शिंदे यांच्या फोनबाजीनंतर राज ठाकरे भाऊ म्हणून शिवसेनेला साथ देणार कि, एक राजकीय नेता म्हणून शिंदे यांना आश्रय देऊन आपले राजकीय वजन वाढवणार ? असे प्रश्न या निमित्ताने उपस्थित केले जात आहेत.

राज ठाकरे १८ जूनला मुंबईतल्या लिलावती रुग्णलायत दाखल झाले होते, त्यानंतर त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली. पायाचे दुखणे वाढल्यामुळे त्यांना शस्त्रक्रिया करण्याचा डॉक्टरांनी सल्ला दिला होता. याआधी एक जूनला शस्त्रक्रिया होणार होती. पण राज ठाकरे यांना कोरोनाचा संसर्ग झाल्याने शस्त्रक्रिया पुढे ढकलण्यात आली होती. टेनिस खेळताना राज ठाकरे यांच्या पायाला दुखापत झाली होती. त्यामुळे डॉक्टरांनी त्यांना हिप बोनची शस्त्रक्रिया करण्याचा सल्ला दिला होता. राज ठाकरे यांच्या पायाचे दुखणे वाढल्याने मे महिन्यात राज ठाकरे यांनी पुणे दौरा अर्धवट सोडला होता. त्यानंतर तब्येतीच्या कारणाने त्यांनी नियोजित अयोध्या दौराही त्यांनी थांबवल्याचे जाहीर केले होते.

काय होते आहे नेमकी चर्चा ?

राजकीय शत्रूचा शत्रू आपला मित्र या ऐतिहासिक न्यायाने बंडखोर एकनाथ शिंदे  गटाचे ३८ आमदार राज ठाकरे यांच्याकडे शिंदे -ठाकरे या दोघांनी ठरविल्यास या बंडाला नवा ट्विट मिळू शकतो. आणि या गटाने भाजपला पाठिंबा दिला तर महाविकास आघाडीचे सरकार कोसळू शकते. अर्थात या सर्व गोष्टी काही दिवसात स्पष्ट होऊ शकतील. दुसरीकडे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनीही शिंदे गटाच्या आमदारांना भाजप किंवा प्रहार पक्षात विलिन होण्याशिवाय पर्याय नाही, असे  म्हटले  आहे. शिंदे या दोन्ही पक्षात विलीन झाले नाहीत आणि त्यांना विलीन होण्याची वेळ आली तर त्यांच्यासमोर मनसेचा देखील एक पर्याय आता खुला झाला असल्याचे म्हटले जात आहे. असे झाले तर भाजपच्याही पथ्यावर हि गोष्ट पडू शकते पण शेवटी भाजप नेतृत्व या प्रकरणात नेमकी काय भूमिका घेणार यावर हा सगळं खेळ अवलंबून आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!