Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

ShivsenaNewsUpdate : राज्यात राजकीय भूकंप आणि सेनेचे नेते अनिल परब यांच्याभोवती ‘ईडी’चा फास

Spread the love

मुंबई : एकीकडे राज्याच्या राजकारणात भूकंप आलेला असताना आणि सर्वत्र शिवसेनेचे बंडखोर मंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्यासोबत गेलेल्या शिवसेनेच्या मंत्र्यांची आणि आमदारांची चर्चा होत असताना  दुसरीकडे राज्याचे परिवहन मंत्री आणि शिवसेनेचे नेते अनिल परब यांची सक्तवसुली संचालनालयाकडून म्हणजेच ईडीकडून तब्बल ११ तास चौकशी चालू होती. ईडीच्या अधिकाऱ्यांनी परब यांना आज पुन्हा बोलावले आहे.


एकनाथ शिंदेंच्या बंडखोरीमुळे केवळ शिवसेनाच नव्हे तर महाविकास आघाडीचं अस्थिर झाली आहे . त्यात  राहिले किती आणि गेले किती असा आमदारांचा हिशेब चालू असताना अनिल परब तिकडे ईडीच्या कचाट्यात अडकले होते.  दापोलीतील साई रिसॉर्ट आणि मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी अनिल परब यांना ईडीने चौकशीसाठी समन्स बजावले होते.

दरम्यान काही दिवसांपूर्वी बजावलेल्या समन्सवेळी अनिल परब चौकशीला उपस्थित राहिले नव्हते. मात्र, पुन्हा एकदा ईडीकडून समन्स आल्यानंतर अनिल परब यांनी काल चौकशीला हजेरी लावली. मंगळवारी अनिल परब यांची ईडीकडून तब्बल ११ तास चौकशी करण्यात आली आणि  रात्री सुमारे अकरा वाजताच्या सुमारास ते ईडीच्या कार्यालयातून बाहेर आले. ईडीला आणखी काही माहिती आवश्यक असल्यास आपण ती देऊ असेही ते म्हणाले.

रत्नागिरीच्या दापोली येथील साई रिसॉर्ट हे अनधिकृत असून पर्यावरण मंत्रालय भारत सरकार यांनी ३१ जानेवारी २०२२ रोजी तोडण्याचे आदेश दिले होते. या आदेशानुसार ९० दिवसांमध्ये रिसॉर्ट मालक किंवा प्रशासनाने हे दोन्ही रिसॉर्ट तोडायचे होते. मात्र, ९० दिवस पूर्ण होऊनही रिसॉर्ट पाडण्यात आले नाही. या रिसॉर्टच्या व्यवहार प्रकरणात परब यांच्यावर मनी लाँड्रिंगचा आरोप करण्यात आला आहे. जेंव्हा कि या रिसॉर्टचा आणि आपला काहीही संबंध नसल्याचे परब यांनी आधीच म्हटले आहे. त्यानंतरही दुसर्यांदा हि चौकशी चालू आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!