Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

MaharashtraPoliticalUpdate : मोठी बातमी : एकनाथ शिंदे यांच्यासोबत शिवबंधन तोडण्याच्या तयारीत असणाऱ्या उमेदवारांची नावे उघड

Spread the love

मुंबई : शिवसेनेचे निष्ठावंत नेते एकनाथ शिंदे यांना जाळ्यात ओढण्यात भाजप यशस्वी झाली असून त्यांच्या सोबत शिवसेनेचे २२ आमदार असल्याचे सांगण्यात येत आहे. गुजरातमधील सूरत येथील हॉटेलमध्ये हे सर्व आमदार असून या आमदारांचे एकनाथ शिंदेंना समर्थन दिले आहे. दरम्यान त्यांचे मन वळविण्यासाठी प्रयत्न केले  असून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे दोन विशेष दूत गुजरातकडे रवाना केले आहेत. आज वर्षावर मुख्यमंत्र्यांनी बोलाविलेल्या सेने आमदारांच्या बैठकीला ५५ पैकी केवळ १८ आमदार उपस्थित असून तब्बल ३७ आमदार गैरहजर आहेत.


माध्यमांच्या वृत्तानुसार एकनाथ शिंदे यांच्यासोबत शिवसेनेचे आमदार २५- २९ आमदार सध्या गुजरातमध्ये आहेत. सूरतमधील मेरिडियन हॉटेलमध्ये ते असून हॉटेलबाहेर पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. दरम्यान, सूरत येथे चंद्रकांत पाटील यांनी एकनाथ शिंदेंची भेट घेतली असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे  शिवसेना फुटीच्या उंबरठ्यावर असल्याची चर्चा आहे. एकनाथ शिंदे यांच्यासोबत हे सर्व आमदार बंड करणार असल्याची चर्चा आहे.

दरम्यान, चंद्रकांत पाटील हे काल गांधीनगर येथील पंतप्रधान मोदींच्या कार्यक्रमाला होते. मात्र, हा कार्यक्रम सोडून पाटील अचानक सूरतला गेले. तिथे त्यांनी एकनाथ शिंदे यांची भेट घेतली असल्याची चर्चा आहे. त्यामुळं शिंदे भाजपच्या संपर्कात असल्याची चर्चा आहे. सध्या त्यांच्यासोबत असलेल्या २२ आमदारांची नावे पुढे आली आहेत.

एकनाथ शिंदे यांच्यासोबत असलेल्या शिवसेना आमदारांची यादी

एकनाथ शिंदे यांच्यासोबत पुढील २० आमदारांसह सूरतमध्ये असल्याचं बोललं जात आहे.

अब्दुल सत्तार : सिल्लोडचे आमदार आणि राज्यमंत्री
संदिपान भुमरे : पैठणचे आमदार आणि राज्यमंत्री
आमदार संजय शिरसाट
आमदार उदयसिंग राजपूत
आमदार प्रा. रमेश बोरनारे
आमदार महेंद्र दळवी
आमदार महेंद्र थोरवे
आमदार भरतशेठ गोगावले
आमदार अनिल बाबर
आमदार प्रकाश अबिटकर
आमदार आणि गृहराज्यमंत्री शंभुराज देसाई
आमदार शहाजी पाटील
आमदार महेश शिंदे
आमदार किशोर आप्पा पाटील
आमदार संजय रायमुलकर
आमदार संजय गायकवाड
आमदार बालाजी किणीकर
आमदार श्रीनिवास वनगा
आमदार शांताराम मोरे
आमदार विश्वनाथ भोईर

याशिवाय शांताराम मोरे, भिवंडी ग्रामीण, चिमणराव पाटील, बालाजी किणीकर, अंबरनाथ यांचीही नावे पुढे येत आहेत.

 

 

आपलं सरकार

Click to listen highlighted text!