Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

MaharashtraPoliticalUpdate : भाजपचा विजय महाविकास आघाडीसाठी मोठा धक्का , मुख्यमंत्र्यांची आज तातडीची बैठक

Spread the love

मुंबई : महाविकास आघाडीला सुरुंग लावून त्यांचे तब्बल २० आमदार फोडत भाजपने आपले पाचही उमेदवार दणके कि चोट पर निवडून आणल्यामुळे महाविकास आघाडीला भाजपने मोठे आव्हान दिले आहे. या पराभवाची कारणमीमांसा करण्यासाठी शिवसेनेचे पक्ष नेते मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सेना आमदारांची उद्या तातडीची बैठक बोलावली आहे.


महाराष्ट्रातील विधानपरिषदेच्या बहुचर्चित निवडणुकीत काँग्रेस उमेदवार भाई जगताप आणि भाजप उमेदवार प्रसाद लाड यांच्यात दहाव्या जागेसाठी कांटे की टक्कर मानली जात होती. मात्र निकालाला अनपेक्षित कलाटणी मिळाली आणि सेफ मानले जाणारे काँग्रेस उमेदवार चंद्रकांत हांडोरे पराभूत झाले. तर भाजपचे प्रसाद लाड आणि काँग्रेसच्या भाई जगताप हे अटीतटीच्या लढतीत विजयी झाले. दरम्यान या निकालामुळे राज्यसभेपाठोपाठ विधानपरिषदेतही पुरेसे संख्याबळ नसताना भाजपने विजय मिळविल्यामुळे महाविकास आघाडीसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.

मतमोजणीस झाला विलंब

महाराष्ट्राच्या विधानपरिषदेतील १० जागांसाठी सकाळपासून दुपारी चार वाजेपर्यंत मतदान झाले. सर्वपक्षीय २८५ आमदारांनी या निवडणुकीत मतदानाचा हक्क बजावला. काँग्रेसने भाजपचे दोन आमदार मुक्ता टिळक आणि लक्ष्मण जगताप यांच्या मतदानावर आक्षेप घेतल्याने मतमोजणी सुरु होण्यास दोन तास विलंब झाला. दरम्यान राज्य निवडणूक आयोगाने आक्षेप निकाली काढल्यानंतर पाचऐवजी सात वाजता मतमोजणीला सुरुवात झाली.

मतमोजणी सुरु असतानाच राष्ट्रवादीचे उमेदवार रामराजे नाईक निंबाळकर यांच्या कोट्यातील मतावर भाजप नेते आशिष शेलार यांनी आक्षेप घेतला. त्यानंतर भाजप उमेदवार उमा खापरे यांच्या कोट्यातील एका मतावरही महाविकास आघाडीकडून आक्षेप घेण्यात आला. त्यामुळे भाजप आणि राष्ट्रवादीत खडाजंगी झाली. सुरुवातीला ही मते  बाजूला काढून ठेवण्यात आली आणि मतपत्रिकेतील खाडाखोडीमुळे दोन्ही मते बाद ठरवण्यात आली. त्यामुळे २८३ मते  वैध ठरली. परिणामी प्रत्येक उमेदवारासाठी पहिल्या पसंतीचा कोटा २५.७१ म्हणजेच २६ इतका झाला. त्यानंतर भाजप आणि राष्ट्रवादी या दोघांनीही या निर्णयावर आक्षेप घेत केंद्रीय निवडणूक आयोगाकडे जाण्याची तयारी दाखवली.

विशेष म्हणजे ही निवडणूक महाविकास आघाडी आणि भाजप दोघांसाठीही प्रतिष्ठेची होती. त्यामुळे सर्वच पक्षांनी ही निवडणूक जिंकण्यासाठी आपली संपूर्ण ताकद पणाला लावली होती. अगदी शेवटच्या क्षणापर्यंत नेत्यांचे प्रयत्न, अपक्षांच्या भेटीगाठी सुरु होत्या, तर आमदार फुटू नये यासाठीही संपूर्ण खबरदारी घेण्यात आली होती. यावेळी सत्ताधारी महाविकास आघाडी आणि भाजप दोघांनीही त्यांचे उमेदवार निवडून येण्याचा दावा केला होता.

दुसरीकडे राष्ट्रवादीने अनिल देशमुख आणि नवाब मलिक यांना मतदानाची परवानगी मिळवण्यासाठीही सर्वोच्च न्यायालयाचे दार ठोठावले मात्र सर्वोच्च न्यायालयाने त्यांना परवानगी दिलीच नाही. त्यामुळे राष्ट्रवादीची आशा मावळली. त्यानंतर ४ वाजेपर्यंत २८५ आमदारांचं मतदान पूर्ण झाले.

दरम्यान मतदानांनंतर नियोजित वेळेनुसार सायंकाळी ५ वाजता मतमोजणीला सुरुवात होणार अशी आशा होती. मात्र, काँग्रेसने भाजपचे आमदार लक्ष्मण जगताप आणि मुक्ता टिळक यांच्या मतदानावर आक्षेप घेतला. त्यांची मतपत्रिका दुसऱ्याने मतपेटीत टाकल्याचा आरोप काँग्रेसने केला होता. त्यामुळे मतमोजणीला विलंब झाला. राज्य निवडणूक आयोगाने काँग्रेसचा आक्षेप फेटाळून लावल्यानंतर केंद्रीय निवडणूक आयोगाकडे तक्रार करण्यात आली. त्यानंतर निवडणूक आयोगाच्या निर्णयानंतर मतमोजणीला सुरुवात झाली.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!