Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

Maharashtra Vidhan Parishad Election Live : सविस्तर बातमी : शेवटी दुसऱ्या मतांच्या पसंतीने भाजपचे प्रसाद लाड सेफ झोनमध्ये गेले आणि हंडोरे -जगताप लढाईत भाई विजयी झाले !!

Spread the love

कुणाला किती मतदान?


प्रवीण दरेकर (भाजपा)- २९
श्रीकांत भारतीय (भाजपा)- ३०
राम शिंदे (भाजपा)- ३०
उमा खापरे (भाजपा)- २७
प्रसाद लाड (भाजपा)- २८
एकनाथ खडसे (राष्ट्रवादी)- २९
रामराजे निंबाळकर (राष्ट्रवादी)- २८
आमश्या पाडवी (शिवसेना)- २६
सचिन अहिर (शिवसेना)- २६
भाई जगताप (काँग्रेस)- २६
चंद्रकांत हंडोरे (काँग्रेस)- २२ (पराभूत)


मुंबई : विधान परिषदेच्या निवडणुकीत शिवसेनेचे सचिन अहीर, आमशा पाडवी, भाजपचे प्रवीण दरेकर, राम शिंदे, श्रीकांत भारतीय, उपा खापरे आणि प्रसाद लाड असे पाच उमेदवार,  राष्ट्रवादी काँग्रेसनं रामराजे नाईक निंबाळकर आणि एकनाथ खडसे तर अत्यंत चमत्कारिक अटीतटीच्या लढतीत दुसऱ्या आणि तिसऱ्या पसंतीच्या मतांनी काँग्रेसच्या भाई जगताप यांचा विजय झाला तर पहिल्या पसंतीत विजयी असणारे चंद्रकांत हंडोरे दुसऱ्या पसंतीच्या मतांनी मागे गेले आणि भाजपच्या लाड यांनी त्यांचा पराभव केला. विशेष म्हणजे अतिशय सेफ झोनमध्ये असलेल्या हंडोरे यांचा पराभव झाल्याने काँग्रेसला मोठा धक्का बसला.


काँग्रेसच्या दृष्टीने विधान परिषद निवडणूक निकालात  दुसऱ्या पसंतीच्या मतांनी चंद्रकांत हंडोरे यांचा घात झाला. या निवडणुकीत पहिल्या पसंतीची काँग्रेसची तीन मते फुटल्याने त्यांचे पहिल्या पसंतीचे उमेदवार चंद्रकांत हंडोरे यांचा शेवटी  पराभव झाला. तर दुसऱ्या पसंतीचे उमेदवार भाई जगताप हे दुसऱ्या आणि तिसऱ्या मतांच्या फेरीवर विजयी झाले आणि  भाजपचे पाचव्या क्रमांकाचे उमेदवार प्रसाद लाड यांचा दुसऱ्या फेरीत विजय झाले.

अंतिम लढाईत भाजपचे लाड सेफ झोनमध्ये गेल्यानंतर दहाव्या जागेसाठी काँग्रेसचे चंद्रकांत हंडोरे आणि भाई जगताप आमने सामने होते. यात भाई जगताप यांचा विजय झाल्याने चंद्रकांत हंडोरे पराभूत झाले आहेत. दरम्यान विधान परिषदेतील काँग्रेसचा झालेला पराभव महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या चांगलाच जिव्हारी लागल्याचे दिसून येत आहे. निकालानंतर त्यांना माध्यमांशी बोलताना सूचक प्रतिक्रिया दिल्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत. थोरात म्हणाले, की हा पराभव धक्कादायक असून सर्वांनीच आत्मपरिक्षण करण्याची गरज आहे. तसेच ते पुढे म्हणाले की सर्व गोष्टी आपल्या बाजून असतानाही पराभव होत असेल तर सरकार म्हणून विचार करण्याची गरज आहे.

दुसऱ्या फेरीत प्रसाद लाड यांनी मारली बाजी

पहिल्या फेरीत भाजपाचे चार उमेदवार निवडून आले होते. तर दुसऱ्या फेरीत प्रसाद लाड आणि काँग्रेसचे भाई जगताप, चंद्रकांत हंडोरे यांच्यात चुरस होती. यात प्रसाद लाड यांनी बाजी मारत निवडून येण्यासाठीचा २६ मतांचा कोटा पूर्ण केला. तर भाई जगताप यांनाही २६ मतं मिळाली आहे. पण चंद्रकांत हंडोरे यांना २२ मतं पडली आहेत.


शेवटी भाई जगताप आणि हंडोरे यांच्यातच लढत झाली …

खरे तर विधानपरिषदेच्या एका जागेवर निवडून येण्यासाठी काँग्रेसला २६ मते आवश्यक होती आणि काँग्रेसकडे ४४ आमदारांचे संख्याबळ असल्याने यापैकी एक उमेदवार सहज विजयी होईल, असे मानले जात होते. मात्र, विधानपरिषद निवडणुकीची मतमोजणी सुरु झाल्यानंतर काँग्रेस पक्षाला मोठा धक्का बसला आहे. या निवडणुकीत एक जागाही सोडा पण काँग्रेसच्या दोन्ही जागा या धोक्यात आल्या होत्या.

पहिल्या फेरीत काँग्रेसचे पहिल्या पसंतीचे उमेदवार चंद्रकांत हंडोरे यांना २२ मत मिळाली होती. तर दुसऱ्या क्रमांकाचे उमेदवार भाई जगताप यांना पहिल्या पसंतीची १९ मत मिळाली होती. मात्र राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन उमेदवार एकनाथ खडसे आणि रामराजे नाईक निंबाळकर यांच्या मतपत्रिकेवर भाई जगताप यांना दुसरा पसंती क्रम असल्याने मतमोजणीच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या फेरीत त्यांनी आघाडी घेतली आणि विजय मिळवला.


पहिल्या फेरीत भाजपचे उमेदवार प्रविण दरेकर यांना २९, राम शिंदे यांना ३०, श्रीकांत भारतीय यांना ३० आणि उमा खापरे यांना २७ मत मिळवत विजय नोंदवला. तर शिवसेनेचे उमेदवार सचिन अहिर आणि आमश्या पाडवी यांनाही प्रत्येकी २६ मत मिळाली. यापाठोपाठ राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार रामराजे नाईक निंबाळकर आणि एकनाथ खडसे यांनीही पहिल्याच फेरीत विजयाच्या २६ मतांचा कोटा पूर्ण केला. रामराजे शिंदे यांचे एक मत बाद ठरुनही त्यांना पहिल्या पसंतीची २८ मत मिळाली. तर खडसे यांना २९ मत मिळाली.

दरम्यान काँग्रेसचे दोन्ही उमेदवार वेटिंगवर राहिले कारण पहिल्या फेरीत  काँग्रेसच्या हंडोरे यांना २२ मते , भाई जगताप यांना १९ तर भाजपच्या प्रसाद लाड यांना १७ मते मिळाली. मात्र, दुसऱ्या आणि तिसऱ्या पसंतीच्या मतांची मोजणी केली असता काँग्रेसचे भाई जगताप काठावर विजयी झाले. तर पाचव्या जागेवरून भाजपचे प्रसाद लाड यांनी काँग्रेसच्या चंद्रकांत हंडोरे यांना मागे टाकत  विजय खेचून आणला. काँग्रेसकडे ४४ आमदारांचे संख्याबळ असूनही शेवटपर्यंत त्यांना दोन्ही उमेदवारांच्या विजयासाठी ताटकळत राहावे लागले. उर्वरित तिन्ही पक्षांचे पहिल्या पसंतीची मते मिळालेले उमेदवार पहिल्या फटक्यातच निवडून आले.


भाजपने मविआची २० मते  फोडली

भाजपने राज्यसभा निवडणुकीपेक्षा आणखी १० जास्त मतं फोडून महाविकास आघाडीला मोठा धक्का दिला आहे. भाजपला पहिल्या पसंतीची एकूण १३३ मतं मिळाली आहेत. शिवसेनेच्या एकूण ५५ मतांच्या कोट्यांपैकी फक्त ५२ मते त्यांना मिळाली आहेत. त्यामुळे शिवसेनेची तीन मतं फुटल्याचे सांगितले जात आहे. तर काँग्रेसकडे एकूण ४४ आमदार होते. मात्र, काँग्रेसच्या दोन्ही उमेदवारांना मिळून एकूण ४१ मते मिळाली आहेत. त्यामुळे त्यांचीही तीन मतं फुटल्याचे निष्पन्न झाले आहे.


महाराष्ट्राच्या विधानपरिषदेतील १० जागांच्या निवडणुकीसाठी मतदान प्रक्रिया पूर्ण झाली आहे. शिवसेना आमदार रमेश लटके यांच्या निधनामुळं त्यांची जागा रिक्त आहे. तर, नवाब मलिक आणि अनिल देशमुख यांना मतदानासाठी परवानगी मिळालेली नाही. त्यामुळे  २८५ आमदारांनी मतदान केले आहे. आता वैध आणि अवैध मत बाजूला केली जातील आणि त्यानंतर मतमोजणीला प्रारंभ होईल. मात्र काँग्रेसने लक्ष्मण जगताप आणि मुक्ता टिळक यांच्या मतदानावर काँग्रेसने आक्षेप घेतल्यामुळे ५ वाजता सुरू होणारी मतमोजणी थांबली आहे.

दरम्यान काँग्रेसच्या अक्षेपाची दखल घेत निवडणूक आयोगाची दिल्लीत बैठक सुरु असल्याचे वृत्त आहे.

भाजपच्या आमदार मुक्ता टिळक आणि लक्ष्मण जगताप यांच्या मतदानावर घेतलेला आक्षेप राज्य निवडणूक आयोगाने फेटाळला आहे.

काँग्रेसच्या तक्रारीनुसार भाजपचे  आमदार लक्ष्मण जगताप आणि मुक्ता टिळक यांनी त्यांची मतपत्रिका दुसऱ्याने मतपेटीत टाकल्याचा काँग्रेसचा आरोप आहे. जो सदस्य मतदान करतो, त्याच सदस्याने आपली मतपत्रिका मतपेटीत टाकावी, असा नियम असल्याचे काँग्रेसचं मत आहे. मात्र लक्ष्मण जगताप आणि मुक्ता टिळक यांच्याऐवजी दुसऱ्याने त्यांची मतपत्रिका मतपेटीत टाकल्याने त्यांचे मत बाद करण्याची मागणी काँग्रेसने केली आहे. काँग्रेसने रिटर्निंग ऑफिसरकडे तशी तक्रार केली आहे. तसेच आपल्या तक्रारीचा निवडणूक आयोगाला मेलही केला आहे. त्यामुळे राज्यसभेप्रमाणे विधान परिषदेच्या मतमोजणीलाही उशीर होईल असे सांगितले जात आहे.

अनिल देशमुख, नवाब मलिक यांना दिलासा नाहीच…

दरम्यान सुप्रीम कोर्टाने राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री नवाब मलिक आणि अनिल देशमुख यांना अंतरिम दिलासा देण्यास नकार दिला आहे. मात्र, या याचिकेवर पुढील चार आठवड्यांपर्यंत सुनावणी सुरु ठेवली जाईल, असा निर्णय सुप्रीम कोर्टानं दिला आहे. अनिल देशमुख आणि नवाब मलिक यांना विधानपरिषदेच्या निवडणुकीत मतदान करण्याची परवानगी मिळालेली नाही. अनिल देशमुख आणि नवाब मलिक यांना आता विधानपरिषद निवडणुकीत मतदान करता येणार नाही हे स्पष्ट झालं आहे. भाजप नेते किरीट सोमय्या यांनी सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर तातडीनं ट्विट करत महाविकस आघाडीवर टीका केली आहे. सुप्रीम कोर्टात या प्रकरणी सुनावणी सुरु राहणारअनिल देशमुख आणि नवाब मलिक यांना तातडीनं दिलासा देण्यास नकार दिला आहे. सुप्रीम कोर्टात यापुढे या प्रकरणी सुनावणी सुरु ठेवण्याचे संकेत दिले आहेत. सुप्रीम कोर्टानं अंतिम आदेश दिला नसल्यानं नवाब मलिक आणि अनिल देशमुख यांची याचिका इतर तुरुंगात असलेल्या लोकप्रतिनिधींच्या मतदानासाठी निर्णायक ठरु शकतो.

किरीट सोमय्यां यांचे ट्विट

सुप्रीम कोर्टाने अनिल देशमुख आणि नवाब मलिक यांच्या याचिकेवर तातडीने दिलासा देण्यास नकार दिला आहे. भाजप नेते किरीट सोमय्यांनी महाविकास आघाडीवर टीका केली आहे. ठाकरे सरकारला आणखी “थप्पड” . सर्वोच्च न्यायालयाने नवाब मलिक आणि अनिल देशमुख ची याचिका फेटाळली, असे किरीट सोमय्या यांनी म्हटले आहे.

राज्याच्या विधान परिषदेच्या दहा जागांसाठी ११ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात असून सकाळी ९ वाजता मतदानाला प्रारंभ झाला आहे . सर्वांना उत्सुकता आहे ती दहाव्या जागेची. भाजप आणि महाविकास आघाडी यांच्यात या जागेसाठी प्रतिष्ठेची लढत होत आहे. राज्यसभेप्रमाणे हि अधिकची जागाही भाजप जिंकणार कि , महाविकास आघडी बाजी मारणार ? हे यातून स्पष्ट होणार आहे.


शिवसेनेकडून सचिन अहीर, आमशा पाडवी रिंगणात आहेत. तर भाजपाकडून प्रवीण दरेकर, राम शिंदे, श्रीकांत भारतीय, उपा खापरे आणि प्रसाद लाड असे पाच उमेदवार निवडणूक लढवत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसनं रामराजे नाईक निंबाळकर आणि एकनाथ खडसे यांना तिकीट दिलं आहे. तर काँग्रेसकडून चंद्रकांत हंडोरे आणि भाई जगताप मैदानात आहेत.

विधान परिषदेच्या दहा जागांसाठी ११ उमेदवार रिंगणात आहेत. विधानसभेतील एक जागा रिक्त आहे तर अनिल देशमुख आणि नवाब मलिक आपणास मतदानाचा अधिकार मिळावा म्हणून सर्वोच्च न्यायालयात गेले असून त्याची सुनावणी तातडीने होते कि नाही यावर त्यांचे भवितव्य अवलंबून आहे. सकाळपासून  २८५ पैकी सर्वपक्षीय २०३ मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला असून यामध्ये  देवेंद्र फडणवीसांसह चंद्रकांत पाटील आणि भाजपच्या १०४ आमदारांचं मतदान पूर्ण झाले आहे. सुधीर मुनगंटीवार आणि लक्ष्मण जगताप यांचे तर जयंत पाटील, अजित पवार, जितेंद्र आव्हाड, दिलीप मोहिते-पाटील, माणिकराव कोकाटे यांचे  मतदान होणे बाकी आहे.

शिवसेनेच्या आमदारांचे पाच-पाच जणांचे गट तयार करण्यात आले असून स्वत: मुख्यमंत्री या आमदारांच्या गटांची भेट घेऊन त्यांना मतदानाबाबत मार्गदर्शन करत आहेत. तर दुसरीकडे भाजपाचे आमदार विधान भवनात पोहोचताच प्रत्येक आमदार विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची भेट घेत आहेत. फडणवीस स्वत: प्रत्येक भाजपा आमदाराला मतदानात कोणता पसंती क्रम द्यायचा आहे याचं मार्गदर्शन करत आहेत.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!