Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

AurangabadNewsUpdate : देवगिरी नागरी बँक आणि जलदुतांनी हाती घेतली अनोखी स्वच्छता मोहीम…!!

Spread the love

औरंगाबाद : देवगिरी बँके कर्मचाऱ्यांनी आणि जलदूतांनी आपल्या श्रमदानातून औरंगाबादच्या समर्थ नगरातील बारव स्वछ करण्याची मोहीम हाती घेऊन एक आदर्श घालून दिला. रविवारी सकाळी ०६:३० वाजता सदर उपक्रमास सुरुवात झाली आणि बघता बघता त्यास समर्थनगरातील स्थानिक नागरिकां सोबत औरंगाबाद वासीयांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.


सतत औरंगाबर शहराच्या पाणी प्रश्नावर वायफळ चर्च्या करण्यापेक्षा प्रत्यक्ष कृतीतूनच त्यावर उपाय करता येऊ शकतात असे प्रास्तविक करताना,  जलदूत किशोर शितोळे यांनी देवगिरी बँक व जलदूत संस्थेच्या माध्यमातून शहरातील, जिल्ह्यातील बारवांचे संवर्धन करीत आहोत, बोअरवेल पुनर्भरण करीत आहोत याची माहिती दिली, तसेच हा भारतीय संस्कृतीचा वारसा सर्वांना अभिमानाने जपण्याचे महत्व विशद केले.

जिल्हाधिकारी सुनील चव्हाण

यावेळी  जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी, नागरिकांनी जागरूक राहून पाण्याचा प्रत्येक थेंब वाचविण्याचे आवाहन केले. शहरातील अनधिकृत नळ, मुख्यजलवाहिनी वरील नळांवर प्रशासन कठोर कारवाई करीत असल्याचे सांगितले. तसेच जलसंवर्धनसाठी देवगिरी बँक, जलदूत अशा  अनेकांची प्रशासनाला साथ हवी आहे, यासाठी युवकांनी पुढे यावे अशी नागरिकांना साद घातली. बारव संवर्धन विषयासाठी प्रशासन सर्व मदत करील असे आश्वासनही त्यांनी  दिले.

सहाय्यक पोलीस उपायुक्त बालाजी सोनटक्के

सहाय्यक पोलीस उपायुक्त बालाजी सोनटक्के यांनीही यावेळी बोलताना आज जलसंवर्धनसाठी प्रत्येक नागरिकांनी पडणाऱ्या पावसाचा थेंब साठविणे हे आद्य कर्तव्य असल्याने युवकांनी या चळवळीत झोकून देण्याचे आवाहन केले. माजी नगरसेवक समीर राजूरकर यांनी , देवगिरी बँक व जलदूतांचे कौतुक करून यापुढे या बारवेची सर्व काळजी आम्ही स्थानिक नागरिक घेऊ असे सांगितले. या उपक्रमा अंतर्गत भारतीय सांकृतीचा उत्तम नमुना असलेल्या शहरांतील ऐतिहासिक बरवाचें जतन करण्यात येत आहे. या अभियानात आज समर्थ नगर येथील बारवेच्या स्वच्छतेने झाली.

यांचा होता सहभाग…

यावेळी देवगिरी बँक फिटनेस क्लबचे सदस्य, जलदूतचे स्वयंसेवक, नागरिक असे 150 जण उपस्थित होते. घमेले, फावडे, झाडू, दोरी, हेल्मेट, सेफ्टी बेल्ट, कुऱ्हाडी, प्रथमोपचार पेटी, अग्निशमन दलाचे पथक, मनपाचे कचरा गाडी पथक, पाणी उपसण्याचा पंप अशी सुसज्ज तयारी करून, देशभक्तीपर गाण्यांच्या सोबत, भारत माता की जय, वंदे मातरम अशा जोशपूर्ण घोषणा देत 15 ट्रिप कचरा, झुडूप तोडणे असे अभियान पार पडले.

जिल्हाधिकारी सुनील चव्हाण, सहाय्यक पोलीस उपायुक्त बालाजी सोनटक्के, समीर राजूरकर, सिद्धार्थ साळवे, यांनी प्रत्यक्ष श्रमदान करून कचरा , गाळ काढण्याच्या कामात भाग घेतला. या  स्तुत्य उपक्रमाबद्दल जलदूत किशोर शितोळे यांचे अभिनंदन केले. यावेळी मनपाच्या स्वच्छता , अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांचा सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मनाली कुलकर्णी यांनी केले व आभार संजय गायकवाड यांनी मानले

या प्रसंगी डॉ. अभय कुलकर्णी, श्रीकांत उमरीकर, भाग संघचालक देवेन्द्र देव, देवगिरी बँकेचे अध्यक्ष किशोरदादा शितोळे, उपाध्यक्ष प्रा संजय गायकवाड, संचालक जयंत अभ्यंकर, मुख्य कार्यकारी अधिकारी रविन नांदेडकर जयंत देशपांडे, अमृता पालोदकर , मनाली कुलकर्णी, संजीवनी शेजुळ, दत्ता हुड, विकास ठाले, गोटूरकर, सिद्धार्थ साळवे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी दत्ता शिंदे, कर्मचारी तसेच जलदूतचे विद्यार्थी जलदूत मोठया संख्येने उपस्थित होते.

 

आपलं सरकार

Click to listen highlighted text!