Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

HingoliNewsUpdate : धक्कादाय्यक : रेशनचा माल काळ्या बाजारात , ११ लाखांचा जप्त

Spread the love

औंढा नागनाथ / प्रभाकर नांगरे : हिंगोली जिल्ह्यातील औंढा नागनाथ येथे  रेशनचे धान्य काळ्या बाजारात दोन वाहनांसह 11 लाखांचा माल जप्त करण्यात आला आहे. औंढा पोलिसांनी हि धाडसी कारवाई केली आहे . अधिक नफा कमावण्यासाठी गोरगरिबांच्या रेशन दुकानातून काळाबाजार करणारी दोन वाहने नागनाथ पोलिसांनी वेळीच पकडली.


हिंगोली जिल्ह्यातील औंढा नागनाथ पोलिस ठाण्यासमोर १९ जून रोजी दुपारी रेशनचे धान्य घेऊन जाणारी दोन वाहने पोलिस निरीक्षक विश्वनाथ झुंजारे यांनी संशयाच्या आधारे अडवली. दोन्ही वाहनांची तपासणी केली असता वाहनांमध्ये रेशनचा गहू व तांदूळ आढळून आला.

पोलीस निरीक्षक विश्वनाथ झुंजारे यांनी  दिलेल्या माहितीनुसार आयशर वाहन क्रमांक एमएच व ७ बी १० ८७ मध्ये ५० पोती गहू व १०० पोती तांदूळ ठेवण्यात आले होते. व पिकअप वाहनात 50 पोती तांदूळ ठेवण्यात आला होता. दोन्ही वाहनांची व रेशनची किंमत 11 लाख 55 हजार रुपये आहे. सध्या एक आरोपी कोठडीत असून, याप्रकरणी औंढा नागनाथ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. सदर कारवाई पोलीस निरीक्षक विश्वनाथ झुंजारे सह पोलीस उपनिरीक्षक मुंजाजी वाघमारे पाटील, सहायक पोलीस उपनिरीक्षक पठाण, अमोल चव्हाण, इम्रान पठाण, गजानन गिरी, ज्ञानेश्वर गोरे, संदीप टाक यांनी केली.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!