Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

MarathwadaNewsUpdate : असोल्यातील गोसावी समाजाला समशानभूमीच नाही …!!

Spread the love

औंढा नागनाथ/ प्रभाकर नांगरे : औंढा नागनाथ तालुक्यातील असोला तर्फे (लाख) येथे गोसावी समाजाला स्मशानभूमी नसल्यामुळे या समाजातील मृत व्यक्तीवर अंत्यसंस्कार कुठे करायचे असा प्रश्न निर्माण झाला होता मात्र महसूल विभाग आणि पोलिसांच्या बंदोबस्तात अंत्यसंस्कार करण्यात आले.


असोला तर्फे (लाख) येथे गेल्या अनेक वर्षापासून अल्पसंख्यांक असलेला गोसावी समाज वास्तव्यात असून त्यांच्या स्मशान भूमीचा प्रश्न त्ततकालिन सरपंच यानी पंधरा वर्षे पूर्वी मार्गी लावलेला असून तसा ग्रामपंचायतीचा नमुना देखील उपलब्ध आहे. परंतु येथील राजकीय मंडळींनी विनाकारण पेच निर्माण केल्यामुळे या समाजातील व्यक्तीच्या अंत्यविधीसाठी सामजिक प्रश्न निर्माण झाला असता त्यांनी गावातील सामजिक आणि आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ते किरणभाऊ घोगडे व पत्रकार प्रभाकर नांगरे यांच्याकडे धाव घेतली असता त्यांनी औंढा नागनाथ तहसीलदार कृष्णा कानगुले यांच्या आणि कुरुंदा पोलिस स्टेशनचे पोलीस अधिकारी गजानन मोरे यांना याबाबत माहिती दिली .

दरम्यान हा प्रश्न लक्षात घेऊन वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली महसुल विभागाचे कर्मचारी पी.के. चट्टे व पोलिस कर्मचारी  नेवाल, आणि त्यांचे सहकारी यांना बोलून गावकऱ्यांशी चर्चा करुन पोलिस बंदोबस्तात अंत्यविधीचा प्रश्न तूर्त मार्गी लावण्यात आला. यावेळी गावचे सरपंच सुनीता करहाळे, उप सरपंच  त्रिशला करहाळे, पोलिस पाटील  तुकाराम दळवे, व गावातील आजी माजी ग्रामपंचायत सदस्य आणि गावातील सर्व नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते. अखेर अंत्यविधी शांतापूर्ण वातावरणात पार पडला.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!