Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

UttarPradeshNewsUpdate : कानपूर , सहारनपूर हिंसाचार : योगी सरकारचा आरोपींच्या घरावर फिरला बुलडोझर ….

Spread the love

सहारनपूर : उत्तर प्रदेशमध्ये शुक्रवारी उसळलेल्या हिंसाचारानंतर कानपूर आणि सहारनपूरच्या  हिंसाचारातील आरोपी आणि त्यांच्याशी संबंधित काही लोकांच्या घरांवर बुलडोझर चालवण्यात आला आहे. या संदर्भात यूपी पोलिसांचे म्हणणे आहे की आरोपीच्या घराचे बेकायदेशीर बांधकाम पाडण्यात आले आहे तर कानपूरमधील कारवाईबाबत पोलीस अधिकाऱ्याचे म्हणणे आहे की, ज्या इमारतीचा  विध्वंस करण्यात आला आहे, ती इमारत हिंसाचाराच्या मुख्य आरोपींशी संबंधित असलेल्या  भूमाफियाची आहे. हिंसाचार संदर्भात आतापर्यंत 13 एफआयआर नोंदवण्यात आले आहेत. यासोबतच 237 आरोपींना अटक करण्यात आली आहे.


प्रयागराज, मुरादाबाद, सहारनपूर, कानपूरसह उत्तर प्रदेशात भाजप प्रवक्त्याने पैगंबर मोहम्मद यांच्यावर केलेल्या वादग्रस्त वक्तव्यानंतर अनेक ठिकाणी हिंसाचार उसळला होता.

मिळालेल्या माहितीनुसार, नगरपालिकेच्या पथकाच्या सहकार्याने आरोपी मुजम्मिल त्याचा मुलगा असमत रा. राहत कॉलनी 62 फुटा रोड पोलीस स्टेशन कोतवाली ग्रामीण जि. सहारनपूर यांच्या अवैध घरावर बुलडोझर चालवून हि प्रभावी कारवाई करण्यात आली आहे. तर सहारनपूर महानगरपालिकेच्या पथकाने आरोपी अब्दुल वकीर आणि त्याचा मुलगा बिलाल रा.खाता खेडी बिलाल मस्जिद पोलीस स्टेशन मंडी जिल्हा सहारनपूर याच्या घरावर मोठ्या पोलीस बंदोबस्तात कारवाई करण्यात आली.

उत्तर प्रदेशातील विविध जिल्ह्यांमध्ये शुक्रवारच्या नमाजानंतर झालेल्या हिंसाचारप्रकरणी पोलिसांनी २२७ हून अधिक लोकांना अटक केली आहे. वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी शनिवारी ही माहिती दिली. अतिरिक्त पोलीस महासंचालक (कायदा व सुव्यवस्था) प्रशांत कुमार यांनी सांगितले की, राज्यात याप्रकरणी 227 जणांना अटक करण्यात आली असून यामध्ये प्रयागराजमधील 68, हाथरसमधील 50, सहारनपूरमधील 48, आंबेडकरनगरमधील 28, मुरादाबादमधील 25 आणि फिरोजाबादमधील आठ जणांचा समावेश आहे.

शुक्रवारीच ट्विटद्वारे दिला होता इशारा…

दरम्यान, हिंसाचार करणाऱ्यांना गर्भित  इशारा देताना, यूपीच्या मुख्यमंत्र्यांचे मीडिया सल्लागार मृत्युंजय कुमार यांनी शनिवारी एका ट्विटमध्ये म्हटले होते कि ,  “दंगलखोरांनो  लक्षात ठेवा, दर शुक्रवारनंतर शनिवार असतो…” या ट्विटसोबत त्यांनी बुलडोझरने इमारत पाडतानाचे चित्रही ट्विट केले होते.

सहारनपूरशिवाय कानपूरमध्ये एका आठवड्याच्या हिंसाचारानंतर प्रशासनाने बेकायदा बांधकाम पाडले आहे. घटनास्थळापासून सुमारे तीन किलोमीटर अंतरावर असलेली ही इमारत पाडण्यात आली आहे. या इमारतीच्या मालकाचे कानपूर हिंसाचाराच्या मुख्य आरोपीशी जवळचे संबंध असून त्याचाही हिंसाचाराच्या कटात त्याचाही  समावेश असल्याचे पोलिसांनी सांगितले.

मुख्यमंत्र्यांच्या कडक कारवाईच्या सूचना…

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी अधिकाऱ्यांना सूचना देताना सांगितले की, “राज्यातील विविध शहरांमध्ये भूतकाळात वातावरण बिघडवण्याच्या अराजकतेच्या प्रयत्नांमध्ये गुंतलेल्या समाजकंटकांवर कठोर कारवाई केली जाईल.” अशा समाजकंटकांना सुसंस्कृत समाजात स्थान नाही. लक्षात ठेवा की कोणत्याही निर्दोषाला त्रास होत नाही, परंतु एकही दोषी राहत नाही. प्रेषित मोहम्मद यांच्या विरोधात भाजपच्या निलंबित नेत्या नुपूर शर्मा यांच्या कथित आक्षेपार्ह टिप्पणीवरून उत्तर प्रदेशातील प्रयागराज आणि सहारनपूरसह अनेक जिल्ह्यांमध्ये लोकांनी शुक्रवारच्या प्रार्थनेनंतर घोषणाबाजी आणि दगडफेक केली.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!