Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

RajyasabhaElectionLiveUpdate : चार राज्य , १६ जागा जाणून घ्या निकाल का थांबले ?

Spread the love

नवी दिल्ली : चार राज्यांमधील राज्यसभेच्या 16 जागांसाठी मतदान संपले आहे. यादरम्यान क्रॉस व्होटिंगचेही आरोप झाले आहेत. राजस्थानमधील ढोलपूर येथील भाजप आमदार शोभा राणी कुशवाह यांच्यावर काँग्रेस उमेदवार प्रमोद तिवारी यांना मतदान केल्याचा आरोप आहे. दुसरीकडे भाजपच्या आमदार सिद्धी कुमारी यांनी भाजप समर्थित उमेदवार सुभाष चंद्र यांना मतदान न करता घनश्याम तिवारी यांना मतदान केले आहे. कैलास मीणा यांच्या मतावरही प्रश्न उपस्थित केले जात आहेत. या खेळामुळे राजस्थानमधील सुभाष चंद्रा यांचे गणित बिघडू शकते जे आठ क्रॉस व्होटिंगचा दावा करत होते. कर्नाटकातही जेडीएसच्या दोन आमदारांनी काँग्रेसला मतदान केले आहे. हरियाणा , महाराष्ट्रात गोपनीयतेचा भंग झाल्याची तक्रार भाजपने केली आहे. हरकतीमुळे सर्वच ठिकाणची मत मोजणी थांबली आहे.


हरियाणात 90 पैकी 89 आमदारांनी मतदान केले. सायंकाळी ५ वाजता मतमोजणी सुरू होईल. काँग्रेस आमदार किरण चौधरी आणि बी.व्ही.बत्रा यांच्या मतांवर सत्ताधारी पक्षाने घेतलेल्या आक्षेपावर निवडणूक आयोग विचार करीत आहे. दुसरीकडे महाराष्ट्रात भाजपचे आमदार प्रसाद लाड यांनी महाविकास आघाडीच्या तीन आमदारांची मते रद्द करण्याची मागणी केली आहे. यशोमती ठाकूर, सुहास कांदे आणि जितेंद्र आव्हाड यांची मते रद्द करण्याची मागणी लाड यांनी केली आहे. जितेंद्र आव्हाड आणि यशोमती ठाकूर यांच्यावर आरोप आहे की, त्यांनी त्यांचे मत त्यांच्या निवडणूक एजंटला दाखवण्याऐवजी ते कागद त्यांच्या हातात दिले. सुहास कांदे यांनी बाहेर येऊन फॉर्म दाखवल्याचा आरोप आहे.

काँग्रेसच्या शिष्टमंडळानेही घेतली निवडणूक आयोगाची भेट

भाजपपाठोपाठ काँग्रेसच्या शिष्टमंडळानेही निवडणूक आयोगाची भेट घेतली असून त्यात पवन बन्सल, रंजिता रंजन आणि विवेक तंखा यांचा समावेश आहे. विवेक तंखा म्हणाले, “आम्ही निवडणूक आयोगाकडे आलो. पी. चिदंबरम आणि सुरजेवाला झूमवर होते. आम्ही म्हणालो मोजणी सुरू करा, थांबवू नका, कारण एकही त्रुटी आढळली नाही. भाजपच्या तक्रारीला आधार नाही. ” आयोगाने आम्हाला गंभीरपणे ऐकून घेतले. ”

महाराष्ट्र, हरियाणामध्ये  मत मोजणी थांबवावी: भाजप

दरम्यान भाजपच्या शिष्टमंडळाची निवडणूक आयोगासोबतची बैठक संपली आहे. केंद्रीय मंत्री मुख्तार अब्बास नक्वी म्हणाले, “भाजपच्या शिष्टमंडळाने आयोगाची भेट घेतली. महाराष्ट्र ,राजस्थान आणि हरियाणाच्या निवडणुकीत गोपनीयतेचा भंग झाला आहे. आम्ही निवडणूक अधिकारी आणि निरीक्षकांकडे तक्रार केली आहे. आयोगाने मतमोजणी थांबवावी आणि निर्णय घ्यावा. नियमानुसार कारवाई अशी विनंती केली आहे.” केंद्रीय मंत्री मुख्तार अब्बास नक्वी, अर्जुन मेघवाल आणि संघटन मंत्री बीएल संतोष यांच्या नेतृत्वाखाली हे शिष्टमंडळ निवडणूक आयोगाकडे पोहोचले होते. केंद्रीय मंत्री गजेंद्र सिंह शेखावत हेही त्यांच्यासोबत उपस्थित आहेत.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!