Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

Rajya Sabha Election Result Live : महाराष्ट्र : सहाव्या जागेसाठी भाजपचा दे धक्का, धनंजय महाडिक विजयी

Spread the love

बहुचर्चित सहावी जागा जिंकत भाजपचा शिवसेनेला दे धक्का, भाजपचे धनंजय महाडिक विजयी, संजय पवार यांचा पराभव दुसऱ्या पसंतीच्या मतांनी धनंजय महाडिक यांना विजय मिळवून दिला आणि भाजपने ही प्रतिष्ठेची जागा मिळवली.

महाराष्ट्र : संजय राऊत, प्रफुल पटेल, पियूष गोयल, अनिल बोंडे इमरान प्रतापगढींचा विजय

महाराष्ट्र : २८४ मतं वैध, मतमोजणीला सुरुवात, थोड्याच वेळात निकाल जाहीर होणार
हरियाणा : हरियाणामध्ये काँग्रेसचे अजय माकन पराभूत, अपक्ष कार्तिकेय शर्मा यांचा विजय 

काँग्रेसच्या वतीनेही सुधीर मुनगंटीवार आणि अपक्ष आमदार आर्वी राणा यांच्याविरोधात तक्रार दाखल करण्यात आल्याची माहिती काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिली असून निवडणूक आयोगासमोर आमच्या तक्रारीची सुनावती होत असल्याचे सांगून पटोले म्हणाले कि , केवळ पराभवाच्या भीतीने भाजपने मतमोजणी थांबवण्याचा प्रयत्न केला आहे , मात्र महाविकास आघाडीचा विजय होईल असा विश्वास पटोले यांनी व्यक्त केला आहे.

कर्नाटक : भाजप ३ । काँग्रेस १ । जेडीएस : ०


राजस्थान : काँग्रेस ३ । भाजप १


कर्नाटक : भाजपचे निर्मला सीतारामन, अभिनेता जिग्गेश आणि लहरसिंह सिरोया हे तीन तर काँग्रेसचे जयराम रमेश विजयी झाले आहेत.


नवी दिल्ली : राज्यसभा निवडणुकीसाठी राजस्थानच्या चारही जागांचे निकाल आले आहेत. राज्यात सत्ताधारी काँग्रेसला तीन जागा जिंकण्यात यश आले आहे, तर भाजपच्या खात्यात एक जागा आली आहे. मीडिया दिग्गज सुभाष चंद्रा अपक्ष म्हणून रिंगणात होते, त्यांनाही भाजपचा पाठिंबा होता, मात्र तरीही त्यांना यश मिळू शकले नाही. चंद्रा यांना 30 मते मिळाली.


काँग्रेसचे वासनिक आणि सुरजेवाला यांना अतिरिक्त मते मिळाली. भाजपच्या आमदार शोभा राणी कुशवाह यांनी क्रॉस व्होट केले, त्याचप्रमाणे भाजपचे अधिकृत उमेदवार घनश्याम तिवारी यांनाही दोन अतिरिक्त मते मिळाली. काँग्रेसचे मुख्य रणनीतीकार आणि राज्याचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी राजस्थानमधील राज्यसभा निवडणुकीच्या निकालावर आनंद व्यक्त केला आहे. त्यांनी ट्विट केले की, “राजस्थानमधील राज्यसभेच्या तीन जागांवर काँग्रेसचा विजय हा लोकशाहीचा विजय आहे. प्रमोद तिवारी, मुकुल वासनिक आणि रणदीप सुरजेवाला या तिन्ही नवनिर्वाचित खासदारांचे मी अभिनंदन करतो. मला पूर्ण विश्वास आहे की, तिन्ही खासदार राजस्थानमधील अधिकार मजबूत करतात. दिल्ली. तुम्ही वकिली करू शकता.

दुसर्‍या ट्विटमध्ये त्यांनी लिहिले की, “काँग्रेसकडे तीनही जागांसाठी आवश्यक बहुमत असल्याचे सुरुवातीपासूनच स्पष्ट झाले होते परंतु भाजपने अपक्षांना उभे करून घोडेबाजार करण्याचा प्रयत्न केला. आमच्या आमदारांच्या एकजुटीने या प्रयत्नाला चोख प्रत्युत्तर दिले आहे. 2023 भाजप विधानसभा निवडणुकीतही अशाच प्रकारे पराभवाला सामोरे जावे लागेल.

कर्नाटकमध्ये भाजपचे १२१ आमदार असूनदेखील त्यांनी तीन जागांवर उमेदवार दिले होते. काँग्रेसने ७० आमदार असताना २ उमेदवार दिले होते. तर, जनता दल संयुक्तने  ३२ आमदार असताना १ उमेदवार दिला होता. मात्र, भाजपने  तीन जागांवर विजय मिळवला आहे तर, काँग्रेसनं एका जागेवर विजय मिळवला आहे.

हा माझा विजय नसून टीम काँग्रेसचा विजय : जयराम रमेश

जयराम रमेश यांनी हा माझा विजय नसून टीम काँग्रेसचा विजय असल्याचे  म्हटले आहे. संपूर्ण काँग्रेस पार्टी, प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष डी.के. शिवकुमार, माजी मुख्यमंत्री सिध्दारामय्या आणि पक्षांच्या प्रतोद आणि सर्व आमदारांचा हा विजय असल्याचे  जयराम रमेश म्हणाले. आमचे  एक मत देखील अवैध ठरले  नाही. हा सांघिक कृतीचा विजय आहे, असे  जयराम रमेश म्हणाले. मन्सूर अली खान यांचा देखील यामध्ये मोठं योगदान असल्याचे  जयराम रमेश म्हणाले. त्यांनी भाजप आणि जेडीएसमधील लिंक समोर आणल्याचे  रमेश यांनी म्हटले. जेडीएस ही भाजपची बी टीम असल्याचा आरोप रमेश यांनी केला.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!