Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

Rajyasabha Election Result Update : महाराष्ट्र , हरियाणा मतमोजणी सुरु , महाराष्ट्रात सुहास कांदे यांचे मत बाद , आयोगाचा निर्णय

Spread the love

नवी दिल्ली :  निवडणूक आयोगाने आरओ/निरीक्षक/विशेष निरीक्षकांच्या अहवालाचे विश्लेषण करून आणि व्हिडिओ फुटेज पाहिल्यानंतर तपशीलवार आदेश पारित करून आमदार सुहास कांदे यांनी दिलेले मत नाकारण्याचे आदेश आरओला देत आणि मतमोजणी सुरू करण्यास परवानगी दिली. त्याच बरोबर निवडणूक आयोगाने हरियाणातील राज्यसभेच्या जागांसाठी मतमोजणीला परवानगी दिली आहे.


 

मुंबई : राज्यसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राबरोबर हरियाणामध्येही राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.  दोन्हीही राज्यात भाजपने केंद्रीय निवडणूक आयोगाकडे तक्रारी करून मतमोजणीस आक्षेप नोंदवला आहे. विशेष म्हणजे दोन्हीही ठिकाणच्या निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी भाजपचे आक्षेप फेटाळून लावलेले आहेत.


दरम्यान केंद्रीय निवडणूक आयोगाकडे केलेल्या तक्रारीत महाराष्ट्रात भाजपने महाविकास आघाडीच्या तीन मतांवर आक्षेप घेतला आहे. त्यामुळे ते तीन मतं बाद करावीत, अशी मागणी भाजपने केली आहे. तर हरियाणामध्येदेखील भाजपने केंद्रीय निवडणूक आयोगाकडे राज्यसभा निवडणुकीत अनियमितता झाल्याची तक्रार केली आहे. त्यामुळे हरियाणाचीही मतमोजणी थांबवण्यात आली आहे.

हरियाणात आज राज्यसभेच्या दोन जागांसाठी मतदान पार पडले पण अपेक्षेनुसार मतमोजणी वेळेवर सुरु झाली नाही. कारण मतमोजणी सुरु होण्याआधी केंद्रीय निवडणूक आयोगाकडे तक्रारी पाठवण्यात आल्या. भाजप नेत्यांनी निवडणूक आयोगाच्या कार्यालयात जावून आक्षेप नोंदवला. भाजप नेता अब्बास नकवी, गजेंद्र शेखावत, अर्जुनराम मेघवाल आणि अर्जुनराम मेघवाल यांनी दिल्लीत केंद्रीय निवडणूक आयोगाच्या कार्यालय गाठत मतमोजणी थांबवण्याची मागणी केली. त्यानंतर निवडणूक आयोगाकडून आरोपांची शहानिशा केली जात आहे.

काय आहे आक्षेप ?

भाजपकडून काँग्रेसचे आमदार किरण चौधर आणि बीबी बत्रा यांच्या मतांवर आक्षेप घेण्यात आला आहे. या आमदारांनी अधिकृत एजंट ऐवजी इतरांना देखील आपली मते दाखवली, असा आक्षेप भाजपकडून घेण्यात आला आहे. दुसरीकडे निवडणूक आयोगाचे रिटर्निंग ऑफिसरने किरण चौधरी आणि बीबी बत्रा यांच्या मतांवरील भाजपचा आक्षेप फेटाळला. त्यानंतर भाजप नेत्यांनी केंद्रीय निवडणूक आयोगाकडे तक्रार केली. या दरम्यान काँग्रेसचे उमेदवार अजय माकन यांनी केंद्रीय निवडणूक आयोगाला पत्र पाठवल्याची बातमी समोर आली आहे.

महाराष्ट्रात नेमकं काय घडलं?

दरम्यान भाजपने राज्याच्या बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर, गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड आणि शिवसेना आमदार सुहास कांदे यांच्या मतांवर आक्षेप घेतला आहे. भाजपने केंद्रीय निवडणूक आयोगाला याबाबत पत्र पाठवत आपला आक्षेप नोंदवला आहे. तसेच मतमोजणीत तीन मतं बाद करा, अशा आशयाचं पत्र भाजपने पाठवलं आहे. या पत्रामुळे मतमोजणी रखडली आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!