Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

HingoliNewsUpdate : देहविक्री करणाऱ्या महिलांचे आधार कार्ड, रेशन कार्ड व मतदान कार्डाची काळजी घेणारे जिल्हाधिकारी …

Spread the love

प्रभाकर नांगरे /  हिंगोली : जिल्हयातील सर्व देहविक्री करणाऱ्या महिलांना स्वत:चे आधार कार्ड, रेशन कार्ड व मतदान कार्ड काढून घ्यावेत. यासाठी संस्थेच्या प्रकल्प व्यवस्थापकांनी प्रोत्साहित करावेत. तसेच एचआयव्ही संसर्गाने बाधित झालेल्यांनी आपली औषधी नियमितपणे घ्यावेत, असे आवाहन जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी केले.


येथील जिल्हाधिकारी यांच्या दालनात जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांच्या अध्यक्षतेखाली आज जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण समितीची बैठक घेण्यात आली. त्यावेळी ते बोलत होते. या बैठकीस जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. राजेंद्र सुर्यवंशी, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.सचिन भायेकर, सहाय्यक आयुक्त यांचे प्रतिनिधी , जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी यांचे प्रतिनिधी, जिल्हा माहिती अधिकारी यांचे प्रतिनिधी, जिल्हा क्षयरोग अधिकारी यांचे प्रतिनिधी , समाज कल्याण अधिकारी यांचे प्रतिनिधी, वरिष्ठ वैद्यकीय अधिकारी, जिल्हा सरकारी कामगार अधिकारी यांचे प्रतिनिधी, जिल्हा कार्यक्रम अधिकारी व इतर विभागाचे सदस्य तसेच अधिकारी आणि सेवाभावी संस्थेचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

यावेळी बोलताना जिल्हाधिकारी  पापळकर म्हणाले, जिल्ह्यातील सद्यस्थितीत असलेल्या देहविक्री करणाऱ्या महिलांनी स्वत:चे आधार कार्ड, रेशन कार्ड व मतदान कार्ड काढून घेण्यासाठी संस्थेच्या प्रकल्प व्यवस्थापक यांच्याशी संपर्क करावे. एचआयव्ही सहजीवन जगणाऱ्या व्यक्तीसाठी विविध सामाजिक लाभाच्या योजनांचा लाभ देण्यासाठी सुरु करण्यात आलेली एक खिडकी योजना सक्षम रित्या राबवावी. त्यांना विविध शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी सर्व विभागांनी योग्य ती कार्यवाही करण्यात यावी. जिल्ह्यातील एचआयव्ही संसर्गित असलेल्या व एआरटी औषधी घेत असलेल्या सर्व रुग्णांनी आपली औषधी नियमितपणे घेण्यात यावे व कोणीही औषधीपासून खंडीत होऊ नये याची खबरदारी घ्यावी. तसेच जिल्हयातील लक्षगट हस्तक्षेप प्रकल्प (TI NGO) अंतर्गत 900 चे उद्दिष्ट असलेला कोअर कम्पोजिट (FSW/TG) प्रकल्प देण्यासाठीचा प्रस्ताव प्रकल्प संचालक, महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण सोसायटी, मुंबई यांना पाठविण्याच्या सूचना जिल्हाधिकारी श्री. पापळकर यांनी दिल्या.

जिल्ह्याचा HIV Positivity ट्रेंड कमी झाल्याबद्दल अभिनंदन

जिल्हाधिकारी श्री. पापळकर यांनी एप्रिल 21 ते मार्च 22 या आर्थिक वर्षामधील जिल्ह्याने सामान्य गटातील 96 टक्के व गरोदर महिलांची 117 टक्के एचआयव्ही चाचणीचे उद्दिष्ट पूर्ण करुन जिल्ह्याचा HIV Positivity ट्रेंड कमी झाल्याबद्दल अभिनंदन केले.

यावेळी जिल्हा कार्यक्रम अधिकारी उध्दव कदम यांनी एचआयव्ही/एड्स कार्यक्रमाचा आढावा सादर केला. यामध्ये एप्रिल 21 ते मार्च 22 या आर्थिक वर्षामध्ये एकूण 73 नवीन रुग्ण आढळून आले आहेत. त्यातील 73 रुणांची ए.आर.टी. औषधोपचारासाठी एआरटी केंद्रामध्ये नोंदणी करण्यात आली आहे. तसेच एचआयव्ही संसर्गित पालकांच्या 18 महिने वरील मुलाची चाचणीचे उद्दिष्ट शंभर टक्के पूर्ण करुन सर्व मुले ही एचआयव्ही मुक्त करण्याचे यशस्वी काम करण्यात आले आहे. जिल्ह्यातील अति जोखीम लोकसंख्या असलेल्या 100 गावांमध्ये एचआयव्ही/एड्स माहिती शिक्षण-संवाद आणि चाचणी अभियान राबविण्यात येणार असल्याची माहिती दिली.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!