Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

HingoliNewsUpdate : जनावरे चोरणारी आंतरजिल्हा टोळी गजाआड ; गुन्हे शाखेची कारवाई

Advertisements
Advertisements
Spread the love

प्रभाकर नांगरे/ हिंगोली : – जनावरे चोरणारी आंतरजिल्हा टोळी गजाआड करण्यांत हिंगोली येथील स्थानिक गुन्हे शाखेला यश आले आहे. यावेळी आरोपींकडून सात लाख 48 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. हिंगोली जिल्ह्यात अनेक शेतकऱ्यांची जनावरे चोरीस गेल्याच्या घटना मागील काही दिवसांमध्ये घडलेल्या होत्या. त्याबाबत हिंगोली शहर पोलीस ठाणे सेनगाव गोरेगाव औंढा नागनाथ वसमत ग्रामीण पोलीस ठाणे येथे गुन्हे दाखल होते. जनावरे करणाऱ्या या टोळीला अटक करण्याचे पोलिसांसमोर आव्हान निर्मण झाले होते.


या प्रकरणात  हिंगोली जिल्हा पोलीस अधीक्षक एम. राकेश कलासागर यांनी स्थानिक गुन्हे शाखेला सदर  जनावरे चोरीचे  गुन्हे उघड करण्याबद्दल तसेच सदर गुन्हेगारांच्या टोळीस पकडण्याबाबत आदेशित करून मार्गदर्शन केले होते. त्यावरून स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने जिल्ह्यात वेगवेगळ्या ठिकाणी घडलेल्या गुन्ह्यांचा घटनास्थळ व परिसराचा तपस करून असे गुन्हे करणाऱ्या आरोपींबाबत गोपनीयरित्या माहिती घेऊन तंत्रशुद्ध तपास पद्धती व सायबर सेल हिंगोली यांच्या मदतीने नमूद गुन्हे करणाऱ्या टोळीला नांदेड शहर व भिवंडी शहरातून जेरबंद केले.

Advertisements

जनावरे चोरांच्या टोळीतील आरोपी

अटक केलेल्या आरोपींमध्ये  मुख्य आरोपी मोहम्मद अहमद मोहम्मद हुसेन साहब (रा. मदिना नगर, नांदेड) (खाटीक) व त्याचे साथीदार मोहम्मद ताहेर मोहम्मद इक्बाल (रा. मिंनत नगर, नांदेड), साबेर लाल डे साब शेख (रा. रालाटर हाऊस ईदगाह रोड भिवंडी जिल्हा ठाणे) यांना प्रारंभी ताब्यात घेऊन अधिक  तपास केला तेंव्हा या टोळीचा छडा लागला.

Advertisements
Advertisements

दरम्यान त्यांनी नमूद जनावरे चोरीची गुन्हे त्यांचे इतर तीन साथीदार इसा कुरेशी उर्फ भैय्या पिता सत्तार कुरेशी (रा. शांती नगर रोड दांडेकर वाडी ठाणे), अन्सारी यातीपुर रहमान यातीपुर रहेमान (रा. अन्सारी नगर दांडेकर वाडी ठाणे), शेख सलीम (रा. कल्याण) यांच्या सोबत मिळून केल्याची कबुली दिली.

चोरीच्या जनावरांची करायचे मांस विक्री …

त्यात यातील भिवंडी येथील सहभागी आरोपी हे गुन्हे करण्यासाठी भिवंडी एकूण नांदेड रेल्वेने येत होते व यातील आरोपी मोहम्मद अहमद मोहम्मद हुसेन साब त्याच्यासोबत मिळून ते जनावरे चोरीचे गुन्हे करून चोरून नेलेली जनावरे विकून त्यानंतर सदर चोरी केलेली जनावरे कापून विक्री करीत होता. आणि गुन्ह्यातील जनावरे चोरून त्यातून मिळालेले पैसे आपसात वाटून घेत होते असे सांगितले. तसेच या आरोपींनी विचारपूस केले असता हिंगोली जिल्ह्यातील जनावरे चोरल्याचा  गुन्ह्याची कबुली दिली.

ही कार्यवाही जिल्हा पोलीस अधीक्षक एम. राकेश कलासागर, अप्पर पोलीस अधीक्षक यशवंत काळे, सहाय्यक पोलिस अधीक्षक यातिष देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक शाखेचे पोलिस निरीक्षक उदय खंडेराव, सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेश मलपिल्लू, सुनील गोपिनवार, पोलीस उपनिरीक्षक भाग्यश्री कांबळे, पोलीस अंमलदार बालाजी बोके, संभाजी लेकुळे, भगवान, किशोर, राजूसिंग ठाकूर, किशोर सावंत, विठ्ठल काळे, आकाश टापरे, ज्ञानेश्वर सावळे, सुमित टाले, शेख जावेद, तुषार ठाकरे यांच्या पथकाने केली.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!