Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

SambhajiBhideNewsUpdate : संभाजी भिडेंशी ना माझा संबंध ,नाही मी कधी पाया पडलो , प्रकाश आंबेडकरांनी पुरावा द्यावा : जयंत पाटील

Spread the love

मुंबई : “माझा संभाजी भिडेंशी कोणताही संबंध नाही. प्रकाश आंबेडकर यांच्याकडे काही पुरावा असेल तर त्यांनी तो पुरावा द्यावा,” अशी मागणी जयंत पाटलांनी केली आहे.वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी राज्याचे जलसंपदा मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यावर कोरेगाव-भीमा प्रकरणात संभाजी भिडेंना क्लिनचिट देण्यास मदत केल्याचा गंभीर आरोप केला होता . यानंतर आता स्वतः जयंत पाटलांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

एबीपी माझा या वृत्त वाहिनीशी बोलताना जयंत पाटील म्हणाले कि , “प्रकाश आंबेडकर यांनी केलेला आरोप अत्यंत हास्यास्पद आहे. माझा संभाजी भिडेंशी कोणताही संबंध नाही. गेले काही वर्ष त्यांचा संपर्कही झालेला नाही. त्यांना कोणत्या प्रकरणात क्लिनचिट मिळाली हेही मला माहिती नाही. त्यांनी कधीही माझ्याकडे येऊन मदत मागितली नाही. त्यामुळे प्रकाश आंबेडकर यांनी असे खोटेनाटे आरोप करणं योग्य नाही.”

कोणत्या प्रकरणात क्लिनचिट मिळाली हेही मला माहिती नाही…

“प्रकाश आंबेडकर यांच्याकडे तसा काही पुरावा असेल तर त्यांनी तो पुरावा द्यावा. या प्रकरणात तपास अधिकारी कोण आहे याचीही मी कधी चर्चा केलेली नाही. तसेच संभाजी भिडे यांना कोणत्या प्रकरणात क्लिनचिट मिळाली हेही मला माहिती नाही. ज्याबाबतीत क्लिनचिट दिल्याचा त्यांना संशय असेल त्याबाबत त्यांनी पुरावे द्यावेत. माझा संबंध नाही आणि उठसूठ कसेही आरोप करायचे हे योग्य नाही,”तसेच “मी संभाजी भिडेंच्या पाया पडल्याचा आरोप प्रकाश आंबेडकर करतात, तर त्यांनी फोटो दाखवावेत. उगाच कसलेही आरोप करू नये. प्रकाश आंबेडकरांकडून असे खोटे आरोप करण्याची अपेक्षा नाही. भिडेंना क्लिनचिट कशी मिळाली याचे स्पष्टीकरण तपास संस्थेकडे मागितले पाहिजे. तपास संस्था काही गोष्टी मांडत असताना कोणत्याही मंत्र्याने त्यावर बोलणे योग्य नाही. कारण असे काही बोलणे तपासावर प्रभाव पाडेल,” असेही जयंत पाटील यांनी नमूद केलं.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!