Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

MaharashtraNewsUpdate : न्यायालयात सक्षमपणे पोलिसांना बाजू मांडता यायला हवी : प्रविण दिक्षीत

Spread the love

औरंगाबाद – कोणत्याही गुन्ह्यात पोलिसांना आपली बाजू सक्षमपणे न्यायालयात मांडता आल्यानंतर कारवाई केल्याचे समाधान मिळते.त्याकरता कोणतीही कारवाई कोणत्याही परिस्थितीत केल्यास ती न्यायालयासमोर मांडतांना सक्षमपणेच मांडली गेली पाहिजे.तरच पोलिसांना आलेला ताण नाहीसा होईल असे मत निवृत्त पोलिस महासंचालक प्रविण दिक्षीत यांनी व्यक्त केले.

गेल्या काही दिवसांपासून राज्यामधे होत असलेल्या राजकिय घडामोडी आणि त्यामधून निर्माण झालेल्या कारवाया यातून पोलिसांना सामोरे जातांना होणारा मनस्ताप या विषयी दिक्षीत आपलं मत मांडत होते.पोलिसांना अशा राजकिय गदारोळातून परिस्थिती हाताळतांना बर्‍याच वेळेस मनस्ताप, अपमान, सूडबुध्दीची वागणूक सामोरे जाव लागते, त्यातून कारवाया कराव्या लागतात. अशा वेळेस त्या कारवाया केल्यानंतर न्यायालयाने पोलिसांची बाजू योग्य मानायला हवी. त्यावेळेस न्यायालय त्या कारवाया राजकिय दबावातून केल्या काय ? किंवा आणखी कोणाच्या दबावाला बळी पडून केल्या या परिस्थीतींना गौण मानते अशा वेळेस न्यायालयात भक्कम पुराव्यासहित बाजू मांडली की कारवाई कोणतीही असो ती केल्याचे समाधान मिळते.या मुद्द्यावर त्यांनी भर दिला.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!