Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

MumbaiNewsUpdate : ताजी बातमी : राणा पती -पत्नीला ७ दिवसांची पोलीस कोठडी द्या , न्यायालयात सुरु आहे सुनावणी …

Spread the love

मुंबई :  मुंबईत गेल्या दोन दिवसांपासून राडा करणाऱ्या खा. नवनीत राणा आणि त्यांचे पती आ. रवी राणा यांना मुंबई पोलिसांनी न्यायालयासमोर हजार केले असून ७ दिवसांच्या पोलीस कोठडीची मागणी केली आहे. या प्रकरणात न्यायालयात सुनावणी सुरु आहे.दरम्यान त्यांचे वकील रिजवान मर्चंट यांनी सांगितले की, खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांची अटक बेकायदेशीर आहे. दोघेही लोकसेवक असल्याने ही अटक बेकायदेशीर आणि घटनाबाह्य असून त्यांना अटक करण्यापूर्वी सभापतींची परवानगी घेणे आवश्यक होते, मात्र कोणतीही परवानगी घेण्यात आलेली नाही. त्याच वेळी, त्यांनी सांगितले की, त्यांच्याविरुद्ध कलम 41 (ए) ची नोटीस खटला सुरू झाल्यापासून 14 दिवसांच्या आत घेण्यात येणार होती, ती अद्याप घेण्यात आली नाही.

https://twitter.com/AHindinews/status/1517906529776594944

कायदा हातात घेण्याचा अधिकार कोणालाही नाही… अजित पवार

शनिवारी दिवसभराच्या  हायव्होल्टेज ड्रामानंतर खासदार नवनीत राणा आणि त्यांच्या आमदार पतीला अटक करण्यात आली.तर राणा दाम्पत्याच्या घरावर छापा टाकणाऱ्या शिवसेना कार्यकर्त्यांवरही एफआयआर दाखल करण्यात आला आहे. राणा दाम्पत्याच्या प्रकरणावर बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले कि , कायदा हातात घेण्याचा अधिकार कोणालाही नाही. तर गृहमंत्री दिलीप वळसेपाटील यांनीही या बाबत भाष्य केले आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार राणा दाम्पत्याने दिलेल्या मुख्यमंत्र्यांच्या मातोश्री बंगल्यासमोर  हनुमान चालीसा पठणाचा इशारा दिल्यामुळे वातावरण तापले  होते.

पोलीस योग्य ती कारवाई करतील : गृहमंत्री

राणा दाम्पत्याला अटक केल्यानंतर त्यांच्या भेटीसाठी भाजपा नेते किरीट सोमय्या खार पोलीस स्थानकात पोहोचले होते. मात्र, परत जाताना त्यांच्या गाडीवर दगडफेक करण्यात आली. यात किरीट सोमय्या किरकोळ जखमी देखील झाले. काल दोन घटना काल घडल्या आहेत. गेले दोन दिवस सतत हनुमान चालीसाच्या नावाने गोंधळ घालण्यात आला आणि त्यानंतर पोलिसांनी योग्य ती कारवाई म्हणून त्यांना अटक केली आहे. काल रात्री जी घटना घडली त्याबाबत पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. त्यानुसार पोलीस आपली कारवाई करतील.

दरम्यान, यासंदर्भात सगळ्यांनी समजुतीनं घ्यावं, असं आवाहन वळसे पाटील यांनी केलं आहे. “दुर्दैवाने अशी घटना घडली आहे. पण त्यात सगळ्यांनीच समजुतीनं सहकार्य करायला हवं. दगडफेक झाली आहे हे खरं आहे. ती कुणाकडून झाली काय झाली, हा तपासाचा भाग आहे. त्याचा तपास करून पोलीस योग्य ती कारवाई करतील”, अशी प्रतिक्रिया गृहमंत्री वळसे पाटील यांनी दिली आहे.

किरीट सोमय्या यांचे आरोप

किरीट सोमय्या यांनी आपल्यावर झालेल्या  हल्ल्याबाबत बोलताना आपला मनसुख हिरेन करण्याचा प्रयत्न चालू असल्याचा आरोप केला. माझ्या ड्रायव्हरने जीवावर उदार होऊन मला वाचवलं, मनसुख हिरेन करण्याचा प्रयत्न होता, माझ्या ८ कमांडोनी मला बाहेर काढलं, माझ्यावरील हल्ल्याला पोलीस आयुक्त संजय पांडे जबाबदार, ठाकरे सरकारचे घोटाळे बाहेर काढणारच असे जाहीर केले.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!