Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

STWorkersNewsUpdate : अद्याप २० हजाराहून अधिक कर्मचारी कामावर परतलेच नाही , २२ एप्रिलची डेडलाईन

Spread the love

मुंबई : न्यायालयाच्या आदेशानंतर एसटी महामंडळातील कर्मचारी कामावर परतण्यास सुरुवात झाली असून  सोमवारी एका दिवसांत एसटी महामंडळातील १५ हजार १८५ कर्मचारी कामावर हजर झाले आहेत. पुढील चार दिवसांत एसटी पूर्ण क्षमतेने सुरू होईल असा एसटी प्रशासनाला विश्वास आहे. तर नव्याने हजर होणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांची वैद्यकीय तपासणी करून त्यांना एक दिवसाचे जुजबी प्रशिक्षण देण्यात येणारं असे परिवहन मंडळाकडून सांगण्यात आले आहे.

मंडळाने दिलेल्या माहितीनुसार आतापर्यंत ८२ हजार १०८ कर्मचाऱ्यांपैकी ६१ हजार ६४७ कर्मचारी कामावर हजर आहेत तर २० हजार ४६१ कर्मचारी कामावर अद्याप बाकी आहेत. प्रशासकीय १२ हजार ६, कार्यशाळा १५ हजार ७८१, चालक २९ हजार ४८५ तर वाहक २४ हजार ८२६ कर्मचारी हजर आहेत.

एसटी महामंडळाचे शासनात विलगीकरण करण्याच्या मागणीसाठी गेल्या ऑक्टोबर पासून एसटी कर्मचारी संपावर आहेत. दरम्यान महामंडळाने कर्मचार्‍यांच्या काही मागण्या मान्य करूनही कर्मचारी आपल्या मागणीवर ठाम होते. अखेर उच्च न्यायालयाने या सर्व कर्मचार्‍यांनी 22 एप्रिलपर्यंत कामावर रुजू व्हावे असे सांगितले. त्यावरून ज्यांच्या विरोधात बडतर्फी, निलंबन अथवा अन्य कारवाया सुरू असतील, त्या मागे घेऊन समज देऊन त्यांना कामावर घेऊ. मात्र, 22 तारखेनंतर जे कर्मचारी कामावर येणार नाहीत, त्यांना नोकरीची गरज नाही, असे समजून त्यांची सेवा समाप्त केली जाईल, असे परिवहनमंत्र्यांनी म्हटले आहे. एसटी महामंडळाने संपातील कर्मचार्‍यांना कामावर हजर होण्यासाठी आतापर्यंत सात वेळा संधी दिली. मात्र, या काळात ३० टक्केही कर्मचारी हजर होऊ शकले नाहीत. आता न्यायालयानेच २२ एप्रिलची डेडलाइन दिली आहे. तोपर्यंत हजर झाले, तर कारवाई होणार नाही. मात्र, त्यानंतर हजर होण्याची संधी मिळणार नाही.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!