Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

MaharshtraPoliticalUpdate : ‘भोंगा आणि हनुमान चालिसा’च्या वादावर असदुद्दीन ओवैसी यांनी दिले हे उत्तर ….

Spread the love

मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भोंगे आणि हनुमान चालिसाचा वाद सुरु केल्यानंतर त्यांच्या या विधानावरून उलटसुलट चर्चा होत होत असताना शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी राज ठाकरे हे हिंदूंचे महाराष्ट्रातील ओवैसी आहेत असे म्हटले होते त्यावर बोलताना  दोन भावांच्या भांडणात माझं नाव कशाला घेता? असा सवाल एमआयएम खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी विचारला आहे.

मुंबई आणि ठाण्याच्या सभेतून मशिदीवरचे भोंगे काढण्यासंबंधी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ठाकरे सरकारला अल्टीमेटम दिला आहे. उद्धव ठाकरे सरकारने ईदपर्यंत मशिदीवरचे सगळे बेकायदेशीर भोंगे काढावेत, नाहीतर मनसे कार्यकर्ते मशिदीसमोर दुप्पट आवाजात हनुमान चालिसा लावतील, असा इशारा राज ठाकरे यांनी दिला आहे. राज ठाकरे यांच्या भूमिकेवर शिवसेनेने टीका टिप्पणी सुरु केली आहे.

या वादावर एमआयएमने कुठलीही प्रतिक्रिया न देण्याचे आदेश आधीच एमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवैसी यांनी दिले होते. यावर बोलताना त्यांनी म्हटले आहे कि ,   “तुम्हाला एकमेकांना जे काही म्हणायचं आहे, जे काही सांगायचं आहे, इशारा द्यायचा आहे, तो एकमेकांच्या नावाने द्या, एकमेकांना सांगा, तुमच्या दोघांच्या भांडणात मला कशाला ओढताय?”  मनसे आणि सेना नेत्यांच्या एकमेकांच्या कुरघोडीवर बोलण्यास त्यांनी नकार देत दोन भावांच्या भांडणात माझं नाव घेऊ नका इतकंच सांगितलं.

दरम्यान संजय राऊतांनी तुमचा उल्लेख महाराष्ट्राचे ओवेसी असा केलाय, यावर तुम्हाला काय म्हणायचे आहे , असा प्रश्न पत्रकारांनी राज ठाकरेंना पुण्याच्या पत्रकार परिषदेत विचारला. यावर राज ठाकरेंनी टिपीकल ठाकरे स्टाईलने उत्तर देताना अशा लवंड्यांबद्दल मी जास्त बोलत बोलत नाही, असं म्हटलं.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!