Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

MaharashtraPoliticalUpdate : सिल्व्हर ओक हल्ला ते भोंगा, आणि ईडीपर्यंत सुप्रिया सुळे यांनी दिली हि उत्तरे…

Spread the love

औरंगाबाद  :  ‘सिल्व्हर ओक’ वर जे काही झाले तो माझ्या आईवर हल्ला होता’ असं मोठा खुलासा राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केला आहे. खासदार सुप्रिया सुळे या आज औरंगाबाद दौऱ्यावर आहेत. यावेळी झालेल्या पत्रकार परिषदेत सुप्रिया सुळे यांनी सिल्व्हर ओकवरील हल्ल्या प्रकरणात पहिल्यांदाच आपली भूमिका मांडली.

पत्रकारांशी बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या कि , ‘सिल्व्हर ओकवर जे काही झाले तो माझ्या आईवर हल्ला होता. मला हे आजही अतिशय प्रामाणिकपणे सांगायचं आहे. मी पोलिसांना संपर्क केला, त्यांना विनंती केली होती, ज्यांनी कुणी हल्ला केला आहे, त्या महिलांशी मला बोलू द्या, त्यांना मला भेटायचे  आहे. त्यांचं नेमकं दु:ख काय आहे, हे मला समजून घ्यायचं आहे. महाराष्ट्रातील एक महिला म्हणून मला जाणून घ्यायचं आहे . त्यांचे प्रश्न समजून घेऊन त्या सोडवायचा प्रयत्न व्हायला हवा.

विविध प्रश्नांना दिली अशी उत्तरे

दरम्यान या पत्रकार परिषदेत त्यांनी विविध प्रश्नांना उत्तरे दिली राज ठाकरे यांच्या भोंगा प्रकरणावर बोलताना त्या म्हणाल्या कि,  ‘मी राज ठाकरे यांना मनोरंजन वगैरे बोलले नाही. मी असं काही बोललेलं मला आठवत नाही. आमच्या कुटुंबियांवर बोलणं ही मोठी बातमी असते, त्यामुळं लोक बोलतात ठीक आहे. राज ठाकरे आणि सभा मला त्यात जास्त काही बोलायचं नाही. प्रत्येक संघटनेला बोलायचा हक्क आहे आणि ते बोलतात. कुणाला कुठं जायचं आहे त्यांना तिथं जाऊ दे. सुप्रिया काहीच बोलत नाही. आमच्या तोंडात शब्द घालू नका, हाथ जोडून विनंती आहे.

राजकारणात हनुमान एन्ट्री यावर कोण कसा आणी काय बोध घेईल कळत नाही. राज्यात दंगली होणार नाही यासाठी आपण सगळ्यांनी प्रामाणिक प्रयत्न करायला हवे. दिल्लीत आणि इतर ठिकाणी झालेली दंगलेने मी अस्वस्थ झाली आहे. हे कुणासाठी चांगलं नाही. यातून अर्थव्यवस्थेला  फटका बसतो.काश्मीर फाइल्स हा वेदना देणारा सिनेमा आहे. तिकडे सगळे छान राहतात सुधारले आहे. त्या समाजबाबत जर तुम्हाला इतकं प्रेम आहे तर जम्मू काश्मीरच्या बजेटमध्ये काहीतरी टाका, बजेटमध्ये काहीच तुम्ही घेतलं नाही असेही सुप्रिया सुळे म्हणाल्या.

शहरातील एमजीएम महाविद्यालयामध्ये एका कार्यक्रमात आदिवासी नृत्याचा कार्यक्रम आयोजित होता. या आदिवासी नृत्यात सहभाग घेऊन सुप्रिया सुळे यांनी ही ताल धरला. ठाणे जिह्यातील जव्हार येथील तारपा नृत्य त्यांनी केले. सुप्रिया यांनी आदिवासी नृत्यवर बराच वेळ ताल धरल्याने आदिवासी कलाकारांचा ही उत्साह वाढला आणि उपस्थितांनीही टाळ्या वाजवून प्रोत्साहन दिला.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!