Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

MaharashtraPoliticalUpdate : गांभीर्याने घ्यायचे नाही म्हणत पवारांनी राज ठाकरे यांना कोललेच… !!

Spread the love

मुंबई : मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी काल जाहीर सभेत केलेल्या आरोपाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे  नेते शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेऊन उत्तरे  दिली आहेत.  राज ठाकरे यांचा एका वाक्यात समाचार घेताना शरद पवार म्हणाले, एखादी व्यक्ती वर्ष, सहा महन्यात एखाद्यावेळी काही तरी बोलते. तेव्हा त्यांना फारसे गांभीर्याने घ्यायचे नसते. दोन -तीन विषय माझ्या वाचण्यात आले. शिवाजी महाराजांचे  नाव मी घेत नाही असा उल्लेख त्यांनी केला. दोनच दिवसांपूर्वी मी अमरावतीला होतो. अमरावतीचे  तुम्ही माझे  भाषण मागवले तर त्याच्यात शिवाजी महाराजांचे  योगदान यावर माझे  कमीत कमी २५ मिनिटांचे  भाषण आहे.  अनेक गोष्टी मी त्यात बोललो आहे.  त्यांचा पक्ष संपत चालला आहे. याची नोंद जनतेने घेतली आहे.

दरम्यान सकाळी उठल्यावर वृत्तपत्र वाचायची मला सवय आहे पण त्यासाठी मला लवकर उठावे  लागते , त्यामुळे खूपदा वृत्तपत्र न वाचताच ते जर  वक्तव्य करत असतील तर जे वाचत नाहीत त्यांच्यावर काय बोलायचे असे  म्हणत शरद पवारांनी राज ठाकरेंना टोला लगावला आहे.

पत्रकारांशी बोलताना शरद पवार पुढे म्हणाले, प्रश्न काय आहेत  लोकांपुढे? महागाईबद्दल ते काहीच बोलले नाही. त्यांच्या भाषणावर काय बोलायचे. माझे मत काय होते सोनियांजींविषयी मुळात स्वतः  सोनियाजींनाच  सत्तेच्या  या मोठ्या पदापर्यंत जायचे नव्हते. त्या स्वत:च बोलल्या होत्या त्यानंतर त्यांनीच सर्वांनी  एकत्र यावे असे सांगितले. पंतप्रधान होण्याबद्दल हे मी आधीच बोललो आहे. त्यांनी वाचन केले नाही त्यामुळे ते असे बोलले. त्यांचा पक्ष संपत चालला आहे. याची नोंद जनतेने घेतली आहे. मी नास्तीक आहे असे ते म्हणाले. माझ्या निवडणुकीचा नारळ कुठे फुटतो हे बारामतीकरांना विचारा. प्रबोधनकारंचे वाचन त्यांनी केले असते तर असे बोलले नसते.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मंगळवारी ठाण्यात आयोजित उत्तरसभेत  शरद पवार, सुप्रिया सुळे, अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसच्या इतरही नेत्यांवर जोरदार टीका केली. राष्ट्रवादी काँग्रेसच्या जन्मानंतर शरद पवार यांनी संभाजी ब्रिगेड, सीग्रेड सारख्या संघटना काढल्या, असा घणाघात राज ठाकरे यांनी केला होता.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!