Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

MumbaiNewsUpdate : नवाब मलिक यांच्या न्यायालयीन कोठडीत १८ एप्रिलपर्यंत वाढ

Spread the love

मुंबई :  मुंबईतील विशेष पीएमएलए कोर्टाने मनी लाँड्रिंग प्रकरणात न्यायालयीन कोठडीत असलेले राज्याचे मंत्री नवाब मलिक यांच्या न्यायालयीन कोठडीत १८ एप्रिलपर्यंत वाढ केली आहे. दरम्यान न्यायालयाच्या आदेशानुसार मलिक यांना कोठडीत बिछाना, खुर्ची उपलब्ध करून देण्यात येणार आहे. तसेच त्यांना घरचे  जेवण आणि औषधं घेण्यासही  परवानगी मिळाली आहे.

मलिक यांच्यावर ईडीने २३ फेब्रुवारीला अटकेची कारवाई केली आहे. यामध्ये त्यांना २१ मार्चपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावत त्यांची रवानगी आर्थर रोड कारागृहात करण्यात आली होती. त्यानंतर मलिकांच्या कोठडीत ४ एप्रिलपर्यंत वाढ करण्यात आली होती. आज पुन्हा एकदा न्यायालयात हजर केलं असताना मलिकांना दिलासा देण्यास कोर्टाने नकार दिला आहे. उच्च रक्तदाब व मधुमेह असल्याने कमी मीठ असलेले घरचे जेवण मिळावे, अशा विनंतीचाही अर्ज करण्यात आला होता. त्यावर मलिक यांचा वैद्यकीय अहवाल पाहून त्यांना औषधं आणि घरगुती जेवण घेण्यास परवानगी देण्यात आली आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!