Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

IndiaNewsUpdate : जय हो !! मोदी सरकारकडून आणखी एक कंपनी विक्रीची कारवाई जारी…

Spread the love

नवी दिल्ली : मोदी सरकारने सत्तेत आल्यापासून निर्गुंतवणुकीच्या योजनेनुसार अनेक सरकारी कंपन्या एक तर विकून टाकणे किंवा त्याचे खासगीकरण करण्याचे धोरण अवलंबविलेले आहे. याच उपक्रमा अंतर्गत अर्थ मंत्रालयाने फेरो स्क्रॅप निगम लिमिटेड अर्थात FSNL या कंपनीमधील सरकारचा संपूर्ण हिस्सा विकण्यासाठी गुरुवारी निविदा मागवल्या आहेत. यासाठी एक्स्प्रेशन ऑफ इंटरेस्ट EOI सादर करण्याची अंतिम तारीख 5 मे ठेवण्यात आली आहे.

याबाबत केंद्रीय अर्थ मंत्रालयाशी निगडित गुंतवणूक आणि सार्वजनिक मालमत्ता व्यवस्थापन विभागाने म्हटले आहे की, “भारत सरकार MSTC लिमिटेडची उपकंपनी असलेल्या फेरो स्क्रॅप निगम लिमिटेड FSNLच्या व्यवस्थापन नियंत्रण हस्तांतरणासह धोरणात्मक विक्रीद्वारे निर्गुंतवणूक करत आहे.”

या सर्व प्रकरणात BDO India LLP प्रस्तावित निर्गुंतवणुकीसाठी व्यवहार सल्लागार म्हणून काम करत आहे. MSTC ची उपकंपनी असलेल्या FSNL ची स्थापना 1979 मध्ये झाली होती. FSNL ची धोरणात्मक विक्री 2022-23 मध्ये पूर्ण होणे अपेक्षित आहे. सरकारने 2022-23 मध्ये सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमांच्या निर्गुंतवणुकीतून 65,000 कोटी रुपये उभारण्याचे लक्ष्य ठेवले आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!