Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

MaharashtraNewsUpdate : आमदारांना घरे देण्याच्या वादावर पवारांनी दिली हि प्रतिक्रिया….

Spread the love

मुबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गुरुवारी विधानसभेत राज्यातील ३०० आमदारांना मुंबईत मोफत घरे  देण्याचा  निर्णय जाहीर केल्यानंतर सर्वसामान्यांकडून नाराजी जाहीर केली जात आहे. तर, विरोधकांकडूनही टीका होत आहे. अशातच आता राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी राज्य सरकारच्या या निर्णयावर प्रतिक्रिया दिली आहे.

आपल्या प्रतिक्रियेत पवारांनी म्हटले आहे कि ,  “आमदारांना घरे देण्याचा महविकास आघाडी सरकारचा निर्णय आहे. आमदारांना घरं द्यायला नको, हे माझं वैयक्तिक मत आहे, गृहनिर्माण योजनेत कोटा ठरवून त्यात आमदारांना घरे द्या, आमदारांसाठी वेगळा गृहनिर्माण प्रकल्प राबवला जाऊ नये.” दरम्यान, या निर्णयावरून शरद पवारांनी सरकारच्या निर्णयाशी असहमती दिल्यानंतर विरोधक टीका करत आहेत. तर, विरोधकांच्या टीकेला मी किंमत देत नाही, असेही पवारांनी म्हटले आहे.

टीकेनंतर अजित पवारांचं स्पष्टीकरण –

“मुख्यमंत्र्यांनी असं म्हटलं की, आमदारांना घरं देऊ, पण मीडियाने असे म्हटले  की, आमदारांना फुकट घरं देणार. पण मी सांगतो कुणालाही घर मिळणार नाही. ज्यांना मुंबईत घर नाही, अशा आमदारांना घरं देणार, असं मुख्यमंत्र्यांचं म्हणणं होतं, सरसकट सर्वांना नाही. मला आणि माझ्या बायकोला तर घर मिळूच शकत नाही,” असं अजित पवार स्पष्टीकरण देत म्हणाले होते.

तर गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांनी या वादावर खुलासा करताना , “आमदारांना देण्यात येणाऱ्या घरांवरून बराच गदारोळ होतोय. मी स्पष्ट करू इच्छितो की, सदर घरे मोफत देण्यात येणार नसून त्या जागेची किंमत+बांधकाम खर्च (अपेक्षित खर्च ७० लाख) याची किंमत संबंधित आमदारांकडून आकारण्यात येणार आहे,” असे म्हटले होते तरीही या विषयावरून होणार विरोध थांबलेला नाही.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!