Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

MaharashtraNewsUpdate : देवदर्शन करून परतणाऱ्या भाविकांच्या टेम्पोला भीषण अपघात , ४ ठार १८ जखमी

Advertisements
Advertisements
Spread the love

मालेगाव : देवदर्शन करून परतणाऱ्या भाविकांच्या टेम्पोला भीषण अपघात होऊन या अपघातात ४ जण जागीच ठार तर १८ जण गंभीर जखमी झाले असल्याचे वृत्त आहे. मालेगाव चाळीसगाव मार्गावर टेम्पोचे ब्रेक फेल झाल्यामुळे हा अपघात झाल्याचे सांगण्यात येत आहे. जखमींना उपचारार्थ शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.


या अपघाताबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मालेगाव-चाळीसगाव मार्गावर आज संध्याकाळी हा अपघात घडला. चाळीसगाव येथील काही रहिवासी मालेगावमधील चंदनपुरी येथे टेम्पोने दर्शनासाठी आले होते. दर्शन झाल्यानंतर सर्वजण चाळीसगावला जात होते. मालेगाव-चाळीसगाव मार्गावर अचानक भरधाव टेम्पोचे ब्रेक फेल झाले. त्यामुळे चालकाचे गाडीवर नियंत्रण सुटले. त्यामुळे टेम्पो महामार्गावर पलटी झाला.

Advertisements

हा अपघात इतका भीषण होता की, यात टेम्पोचा चुराडा झाला. टेम्पोमध्ये २० ते २२ जण प्रवास करत होते. त्यामुळे अचानक झालेल्या या अपघातात ४ जणांचा मृत्यू झाला आहे. १८ जण गंभीर जखमी झाले असून जखमींना तातडीने शासकीय आणि खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

Advertisements
Advertisements

आपलं सरकार

Click to listen highlighted text!