Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

MaharashtraPoliticalUpdate : हिम्मत असेल तर सरकार पडून दाखवा आणि ते छापे बंद करा : मुख्यमंत्री

Spread the love

मुंबई : महाविकास आघाडीचे सरकार म्हणजे दाऊद सरकार अशी टीका करणाऱ्या देवेंद्र फडणवीस आणि भाजपला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जशास तसे उत्तर देत आपला आक्रमक बाणा दाखवला आहे. मुंबईत  होणाऱ्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे  यांनी भाजपचा उल्लेख सापाचे पिल्लू असा करत या सापालाच्या पिल्लाला आम्ही ३० वर्षे दूध पाजले, आता ते वळवळ करत आहे, अशा शब्दात टीका केली आहे. हिम्मत असेल तर सरकार पाडून दाखवा असे थेट आव्हानच मुख्यमंत्र्यांनी भाजपाला दिले आहे. 


दरम्यान केंद्रीय तपास यंत्रणांच्या सततच्या छाप्यांमुळे आपण दबून न जाता आक्रमकपणे तोंड देऊ असे  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला सूचित केले . केंद्रीय तपास यंत्रणांनी महाविकास आघाडी सरकारचे मंत्री नेत्यांच्या घरी छापे टाकून त्यांच्यावर कारवाया करणे सुरू ठेवले आहे. यावरही मुख्यमंत्र्यांनी भाष्य केले आहे. तुमच्यात हिम्मत असेल तर दाऊदला पकडून दाखवा, छापे कसले टाकता.. ? आता हे छापे बंद करा, आघाडी सरकार हे छापे आता खपवून घेणार नाही, अशा शब्दात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजप आणि केंद्र सरकारला इशारा दिला आहे.

राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला मंत्री छगन भुजबळ यांच्या रामटेक या निवासस्थानी स्नेह भोजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्यानंतर येथे बैठकही घेण्यात आली. या बैठकीला शिवसेनेचे आमदार आणि मंत्री उपस्थित होते. या वेळी मुख्यमंत्री बोलत होते.

माझे १७० मोहरे तुमच्या गोटात घेऊन दाखवा आणि सरकार पाडून दाखवा

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे सरकार सत्तेत आल्यापासून हे सरकार लवकरच पडेल, अशी वक्तव्ये भाजपचे नेते सतत करत आहेत. अलिकडे केंद्रीय मंत्री नारायण राणे हे देखील आघाडी सरकार पडण्याबाबत वक्तव्ये करत आहेत. यावरही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाष्य करत भाजपला आव्हान दिले आहे. माझे तुम्हाला आव्हान आहे की माझे १७० मोहरे तुमच्या गोटात घेऊन दाखवा आणि सरकार पाडून दाखवा असे आव्हान ठाकरे यांनी भाजपला दिले आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!