Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

MaharashtraNewsUpdate : नथुरामची भूमिका केली खरी पण गांधींच्या कुणाचा समर्थक नाही , मी दिलगिरी व्यक्त करतो : अमोल कोल्हे

Spread the love

पुणे : राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे यांनी अखेर ‘व्हाय किल आय गांधी’ या सिनेमात नथुराम गोडसेची भूमिका केल्याबद्दल जाहीर दिलगिरी व्यक्त केली आहे. महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथीच्या पूर्वसंध्येला आळंदी येथील इंद्रायणी घाटावर महात्मा गांधी यांच्या स्मारकावर आत्मक्लेश करून त्यांनी  नथुरामची भूमिका केल्यामुळे ज्यांच्या भावना दुखावल्या असतील, त्याबद्दल  दिलगिरी व्यक्त केली. दरम्यान  ‘महात्मा गांधी यांच्या खुनाचे आपण कधीही समर्थन केलेले नाही आणि करणारही नाही हे मी वेळोवेळी स्पष्ट केले असल्याचेही कोल्हे यांनी म्हटले आहे.

‘व्हाय किल आय गांधी’ चित्रपटात अमोल कोल्हे यांनी नथुराम गोडसे यांची भूमिका साकारल्यामुळे एकच वाद पेटला होता. अखेरीस आज अमोल कोल्हे यांनी आपली चूक सुधारण्याचा प्रयत्न करताना महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथीच्या पूर्वसंध्येला आळंदी येथील इंद्रायणी घाटावर असलेल्या राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या स्मारकाला भेट देऊन आदरांजली वाहिली आणि आत्मक्लेशकेला. ते म्हणाले कि, याबद्दल आधीही मी स्पष्टीकरण दिले होते. पण माझ्या भूमिकेमुळे अनेक तरुणाच्या भूमिका दुखावल्या गेल्या होत्या. या सिनेमाच्या निमित्ताने अनेक गांधीवादी विचारवंताच्या भावना दुखावल्या गेल्या, त्याबद्दल मी खेद आणि दिलगिरी व्यक्त करतो, असं अमोल कोल्हे म्हणाले. तसेच, मी  ‘नथुरामची भूमिका केली खरी  पण ती विचारधारा स्वीकारली असा त्याचा अर्थ अजिबात नाही. एखादं नाटक, लेख किंवा एखाद्या चित्रपटामुळे महात्मा गांधी यांची विचारधारा पुसली जाणार नाही. मात्र या भूमिकेवर तरुणांमध्ये ज्या प्रकारे प्रतिक्रिया उमटली ती पाहाता यातून गांधींजींचे विचार आजही तरुणाईत तितकेच प्रभावीपणे रुजले असल्याचे दिसून आले ही महत्त्वाची बाब आहे, असंही कोल्हे म्हणाले.

 

आपलं सरकार

Click to listen highlighted text!