Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

#Osmanabad | तुळजापूर तालुक्यातील निष्पाप बालकाची अल्पवयीन आरोपीने केली निर्घृणपणे हत्या

Spread the love

या आरोपी मुलाला क्राईम पेट्रोल पाहण्याचे होते व्यसन. वाढती बालगुन्हेगारी पोलिस प्रशासनांपुढे आव्हान


नळदुर्ग तुळजापूर – शेख अहेमद (प्रतिनिधी)

तुळजापूर तालुक्यातील सांगवी (मार्डी) येथील पाच वर्षीय निष्पाप बालकाचा गावातीलच एका अल्पवयीन मुलाने दोरीच्या सहाययाने गळा दाबून निर्घृणपणे हत्या केली आहे.

उस्मानाबाद, तुळजापूर तालुक्यातील सांगवी (मार्डी) येथील ओम मनोज बागल वय वर्ष पाच हा मुलगा १६ डिसेंबर रोजी राहत्या घरातून साधारणतः दुपारी तापेची गोळी आणण्यासाठी बाहेर पडला मात्र संध्याकाळ पर्यंत घरी परतलाच नसल्याची बाब घरातील लोकांच्या लक्षात आल्यानंतर सर्वत्र शोधाशोध चालू केली तरी देखील त्याचा शोध न लागल्याने सोशल मीडियावर लोकांना संदेश पाठवण्यात आले. मात्र सर्व निष्फळ ठरले.

शुक्रवारी सकाळी १७ डिसेंबर रोजी मात्र घराशेजारीच असलेल्या एका घरामध्ये या बालकाचा मृतदेह आढळून आला. या बालकाच्या कानातील बाळी नसल्याचे प्रत्यक्षस्थळी दिसून आले. उप नावाने चिडवत असल्याचा मनात राग धरून त्या अल्पवयीन मुलाने ओम बागल याची गळा आवळून हत्या करण्यात आली असल्याचे वृत्त आहे. घटनास्थळी तुळजापूर पोलीस ठाण्यातील पोलिस निरीक्षक अजिनाथ काशीद व सहकाऱ्यांनी घटनास्थळी भेट घेतली. सोबत श्वान पथकालाही बोलवण्यात आले होते. या अशा घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. पुढील तपास चालू आहे.

अल्पवयीन मुलांकडून होणारे गुन्हे, ही जागतिक समस्या बनली आहे. यास भारतासारखे सहिष्णू राष्ट्र किंवा नाशिकसारखे धार्मिक शहरदेखील अपवाद नाही. विधी संघर्षित बालकांची संख्या झपाट्याने वाढत असून, ती थोपवण्यासाठी व्यापक प्रयत्नांची आवश्यकता आहे. बाल गुन्हेगारीचा शिक्का अनेक मुलांना हळूच गुन्हेगारी जगाचे दरवाजे उघडे करतो यात शंका नाही. गुन्हेगारीचे हे पहिले पाऊल सरकारने वेळीच रोखायला हवे.

बदलती लाइफस्टाइल, महागड्या गॅझेटचे आकर्षण, वाहनांची हौस अशा अनेक कारणांमुळे अल्पवयीन मुले गुन्हेगारीकडे वळतात. अल्पवयीन मुले लागलीच प्रभावीखाली येतात. मोठ्यांकडून मिळणाऱ्या चुकींच्या मार्गदर्शनामुळेही गुन्हेगारी वाढते. प्रत्येक मुलाची मानसिकता वेगळी असून, त्याचा सर्वांनी गंभीरपणे विचार करायला हवा. आर्थिक जबाबदारीमुळे पालकांचा मुलांशी संवाद कमी असणे हे देखील महत्त्वाचे कारण आहे. टेलिव्हीजन वा इंटरनेटवर पाल्य हिंसक बाबी, अफेयर, कट-कारस्थान याचेच धडे घेणार असेल तर तो तसा प्रयत्न नक्कीच करून पाहतो. ही मनोवृत्ती असून, हे समजून घेण्यासाठी पालकांनीही सजग असायला हवे.


नळदुर्ग तुळजापूर – शेख अहेमद (प्रतिनिधी)

आपलं सरकार

Click to listen highlighted text!