Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

#BhokardanCrime | अल्पवयीन मुलीचा तीन वेळा विवाह लावून चौथ्या तयारीत फसला डाव..!

Spread the love

महानायक भोकरदन प्रतिनिधी – सुरेश गिराम

अल्पवयीन मुलीचा तीन वेळा विवाह लावून चौथ्या ची तयारीत डाव फसला..पीडीत तरुणीने केली होती तक्रार… चौथा विवाह लावताना पोलिसांनी १२ नानांना पकडले असून त्यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.


भोकरदन शहरातील म्हाडा कॉलोनीत राहणाऱ्या एका अल्पवयीन मुलीचा आई आणि भावांनी तीन वेळा बालविवाह लावून पुन्हा चौथ्यादा ही लग्नलावून देण्याची तयारी सुरू असताना पिडीत मुलीने पोलिसांशी संपर्क केल्याने तिचा चौथा विवाह हुकला व तिच्या तक्रारीवरून आई दोन भाऊ व पतीसह इतर १२ जणांविरुद्ध भोकरदन पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणा बाबतची भोकरदन पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, शहरातील म्हाडा परिसरात एक महिला दोन मुले , एका अल्पवयीन मुलीसोबत राहते. अल्पवयीन मुलीचा बालविवाह तिच्या आई आणि भावांनी शेंदूरणी येथील एका मुलाशी (ता. जामनेर जिल्हा जळगाव) पैसे घेऊन लावून दिला. एक महिन्यांनी मुलगी परत माहेरी आली. त्यानंतर काही दिवसांनी पाचोरा तालुक्यातील वरखेडी येथील एकासोबत दुसरा विवाह लावण्यात आला. येथे तीन ते चार दिवस राहिल्यानंतर तिला परत भोकरदनला आणून शहरातील एकासोबत तिसरा विवाह लावला. त्याच्यासोबत पीडिता १ वर्ष औरंगाबाद येथे राहिली. यावेळी त्यांच्यात शारीरिक संबंध आले. मात्र, वाद झाल्याने पीडिता चार महिन्यांपूर्वी पुन्हा माहेरी म्हाडा परिसरात आली.

दरम्यान, ३ डिसेंबर रोजी आई व भावांनी चौथे लग्न लावून देण्यासाठी जळगावकडील पाहुणे येणार असल्याचे सांगितले. पिडीता लग्नास तयार होत नसल्याने भावांनी मारहाण केली. जीवाला धोका असल्याने तिने चाईल्ड हेल्पलाईन १०९८ (Child Helpline 1098) वर संपर्क केला. यानंतर पोलिसांनी तिची भेट घेवून चौकशी केली. तिच्या तक्रारीवरून आई, दोन भाऊ, तीन पतीसह १२ नातेवाईकांवर ३ डिसेंबर रोजी रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास उपविभागीय पोलिस अधिकारी इंदलसिंग बहुरे, सपोनि रत्नदीप जोगदंड यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि राजाराम तडवी, महिला पोलिस कर्मचारी संगीता मोकाशे, अनिता दाभाडे हे करीत आहेत.

धक्कादायक म्हणजे, सदर अल्पवयीन मुलीने पोलिसांना दिलेल्या जबाबात म्हटले आहे की, मला आई वडील कोण आहेत हे माहीत नाही. सध्या ज्यांच्याकडे राहते त्या लहानपणापासून सांभाळतात. मी त्यांना आई मानते. यामुळे पिडीतेचे खरे आई वडील कोण याचा तपास लावणे देखील पोलिसां समोर मोठे आव्हान आहे.


महानायक भोकरदन प्रतिनिधी – सुरेश गिराम

आपलं सरकार

Click to listen highlighted text!