Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

T20 World Cup 2021, IND vs PAK | भारताचे पाकिस्तानसमोर 152 धावांचे लक्ष्य

Spread the love

24.10.21 | T20 World Cup 2021, IND vs PAK | भारत – पाकिस्तान सामन्याविषयी लाईव्ह अपडेट्स एका क्लिकवर :

पाकिस्तानविरोधातील सामन्यापासून भारतीय संघाच्या टी-20 विश्वचषकाला आज सुरुवात होणार आहे. पाकिस्तान संघाने आपल्या अंतिम 12 खेळाडूची घोषणा केली आहे. भारतीय संघाच्या अंतिम 11 खेळाडूबाबत अद्याप संभ्रम असल्याचे दिसत आहे. आतापर्यंत एकदाही पाकिस्तानविरोधात भारतीय संघाचा पराभव झालेला नाही. ही भारतीय संघासाठी जमेची बाजू मानली जात आहे. पण टी-20 मध्ये काय होणार याकडे सर्वांचं लक्ष आहे. बाबर आझमच्या संघाविरोधात विराट कोहलीचा संघ कसा सामना करतो, हे पाहण औत्सुक्याचे ठरणार हे खरं !

भारतीय संघाची प्लेईंग जवळपास निश्चित झाली आहे. सामन्याआधी झालेल्या पत्रकार परिषदेत विराट कोहलीने हार्दिक पांड्या खेळणार असल्यासाजे स्पष्ट केले आहे. त्यामुळे राहुल, रोहित, विराट, सूर्यकुमार, पंत आणि हार्दिक पांड्या या आघाडीच्या खेळाडूंना पाकिस्तानविरोधात खेळताना तुम्ही पाहू शकता. हार्दिक पांड्याला एका रात्रीत पर्याय शोधणे कठीण आहे. गरज भासल्यास तो दोन षटकं गोलंदाजी करु शकतो, असे विराट कोहलीने पत्रकार परिषदेत स्पष्ट केले आहे.


केंव्हाही आणि कुठेही फक्त एका क्लिक वर जाणून घ्या आयसीसी टी -20 विश्वचषकच्या लाईव्ह अपडेट्स

Pakistan : 152/0 (17.5)

M. Rizwan : 70* (52) | B. Azam : 66* (51)

India : 151/7 (20)

  • भारताचे पाकिस्तानसमोर 152 धावांचे लक्ष्य

  • विराट कोहली आऊट.

  • रविंद्र जाडेजा 13 धावा  करून आऊट.

  • भारताचा कर्णधार विराट कोहलीने अर्धशतक ठोकले.

  • भारताच्या शंभर धावा पूर्ण; विराट कोहली, रविंद्र जाडेजा मैदानात

  • भारताला चौथा झटका लागला असून शादाब खानच्या गोलंदाजीवर रिषभ पंत आऊट झाला आहे. त्याने 30 चेंडूवर 39 धावा केल्या.

 

  • सलामीवीर रोहित शर्मा, केएल राहुल यांच्या पाठोपाठ सुर्यकुमार यादवनेही आपली विकेट्स गमावली आहे. भारतीय संघाला सावरण्यासाठी आणि कर्णधार विराट कोहलीची साथ देण्यासाठी रिषभ पंत मैदानात आला आहे. रिषभ पंतकडून चागंल्या खेळीची अपेक्षा केली जात आहे.

  • पाकिस्तानच्या हसन अलीच्या गोलंदाजीवर सूर्यकुमारने विकेट्स गमावली आहे. सूर्यकुमारला 8 चेंडूत केवळ 11 धावा करता आल्या.

  • रोहित शर्मानंतर भारताला दुसरा झटका बसला असून केएल राहुल त्रिफळाचित झाला आहे.

  • भारताला पहिला झटका बसला असून सलामीविर रोहित शर्मा पहिल्याच षटकात बाद झाला आहे.

  • नाणेफेक जिंकून पाकिस्तानने घेतला गोलंदाजी करण्याचा निर्णय

 

  • आयसीसी टी -20 विश्वचषकात, भारत आणि पाकिस्तानचे संघ रविवार, 24 ऑक्टोबर रोजी आमनेसामने येतील. हा सामना दुबई इंटरनॅशनल स्टेडियमवर भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 7.30 वाजता खेळला जाईल. सामन्याची नाणेफेक सायंकाळी 7 वाजता होणार आहे.सामन्यापूर्वी विराट

 

  • भारताविरोधात पाकिस्तानचा संघ (अंतिम १२) : बाबर आझम (कर्णधार), मोहम्मद रिझवान, फखर जमान, मोहम्मद हाफीज, शोएब मलिक, आसिफ अली, इमाद वसीम, शादाब खान, हॅरिस रॉफ, हसन अली, शाहीन शाह आफ्रिदी, हैदर अली.

 

  • भारत संभाव्य ११ : केएल राहुल, रोहित शर्मा, विराट कोहली (C ), सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत (WK ), हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, वरुण चक्रवर्ती/रविचंद्रन अश्विन, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह

 

  • कोहलीनं म्हटले आहे की, आम्ही विजयासाठी पूर्णपणे सकारात्मक आहोत. या सामन्याला आम्ही इतर सामन्यासारखंच पाहात आहोत. मला माहितीय की, बाहेर या सामन्याची खूप चर्चा आहे. पण आम्ही याबाबत जास्त विचार करत नाहीयेत. आमच्यासाठी हा सामना नेहमीसारखाच एक सामना आहे. ज्यात आम्ही नेहमीसारखं उत्तम खेळू. मैदानाबाहेर फार उत्साह, जोश असेल. पण खेळाडू म्हणून आम्ही पूर्ण ताकतीनं उतरु, असं विराट म्हणाला.

 

  • बाबर आझम, पाकिस्तानचा कर्णधार, : “आम्ही भूतकाळात काय केले ते विसरलो आहोत आणि भविष्यावर लक्ष केंद्रित करण्याचा प्रयत्न करत आहोत. आम्ही हा सामना उत्तम खेळू आणि विक्रम कायम करण्याचा प्रयत्न करू.

 

  • https://twitter.com/ANI/status/1452217934575714310

आपलं सरकार

Click to listen highlighted text!