Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

MumbaiNewsUpdate : एनसीबीच्या कारवाईत सहभागी झालेले “ते ” दोघे कोण ?

Spread the love

मुंबई : मुंबईच्या समुद्रात क्रूझवरील ड्रग पार्टीवरएनसीबीने केलेली कारवाई  सध्या राजकीय चर्चा विषय झाली असून ही  कारवाई पूर्णपणे बनावट असल्याचे सांगत यामागे भाजप असल्याचा गंभीर आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी केला आहे. दरम्यान या कारवाईत एनसीबी अधिकारी असल्यासारखे आरोपींवर कारवाई करताना दिसलेले  मनीष भानुशाली  आणि के. पी. गोसावी हे एनसीबीचे अधिकारी नाहीत तर कोण आहेत ? यावरून चर्चा सुरु झाली आहे.

दरम्यान मलिक यांनी दिलेल्या माहितीनुसार मनीष  भानुशाली हा भारतीय जनता पक्षाचा उपाध्यक्ष आहे. तर गोसावी हा खासजी हेर असल्याचा दावा करीत असल्याचे म्हटले आहे. यापैकी मनीष भानुशालीचे फोटो देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहा, नड्डा देवेंद्र फडणवीस आणि आशीष शेलार यांच्यासोबत आहेत, अशी माहिती देतानाच मनीष भानुशाली आणि एनसीबीचे संबंध काय आहेत हे एनसीबीला सांगावे लागेल, असे नवाब मलिक यांनी म्हटले आहे.

होय मी भाजपचा कार्यकर्ता…

दरम्यान नवाब मलिक यांचे आरोपांचे शब्दबाण सुटताच हा बॅन वर्मी लागल्याने स्वतःच माध्यमांसमोर येत होय आपण भाजप कार्यकर्ते असल्याची कबुली मनीष भानुशाली याने दिली आहे मात्र आपण पदाधिकारी नसल्याचे त्याने म्हटले आहे.

नवाब मलिक यांनी मनीषची माहिती देताना सांगितले की, २१ तारखेला मनीष भानुशाली दिल्लीत होता. तो काही मंत्र्यांच्या घरी होता. २२ तारखेला तो गुजरातमधील गांधीनगर येथे मंत्रालयात होता. तेथे २८ तारखेपर्यंत त्याच्या मिटिंग होत राहिल्या. २१-२२ तारखेला गुजरातमधील मुंद्रा बंदरात ३००० हजार की २७ कोटींचे ड्रग पकडले. मग भानुशाली दिल्लीत कोणाला भेटत होता, तो गुजरातमध्ये कोणत्या मंत्र्यांसोबत बसत होता. २८ तारखेपर्यंत तो गुजरातच्या मंत्रालयात काय करत होता. २८ तारखेला तो पुन्हा मुंबईला आला. पुन्हा १ ऑक्टोबरला गुजरातला गेला आणि मंत्रालयात राणा नावाच्या मंत्र्याला भेटला. आणि त्यानंतर ३ तारखेला क्रूझवरील छापेमारीत लोकांना अटक करतो. या सर्व प्रश्नांची उत्तरे एनसीबीला द्यावी लागतील. भानुशालीचे गुजरात ड्रगशी काय संबंध आहे हे देखील एनसीबीला सांगावे लागेल. क्रूझवरील छाप्याचा गुजरात ड्रग प्रकरणाशी संबंध असून एनसीबी भाजपच्या लोकांना हाताशी धरून लोकांना अटक करत आहे, असा गंभीर आरोपही मलिक यांनी केला आहे.

कारवाईत सहभागी असणारी दुसरी केस नसलेली व्यक्ती कोण ?

शाहरूख खानचा मुलगा आर्यन खान याला एनसीबी कार्यालयात नेण्यात येत असल्याचा एक व्हिडिओ प्रसिद्ध झाला आहे. यात डोक्यावर केस नसलेली एक व्यक्ती आर्यन खानला हाताने पकडून घाईघाईत अटक करून नेत आहे. तीच व्यक्ती नंतर आर्यन खानसोबत सेल्फी घेत असल्याचा फोटो व्हायरल झाला आहे. मात्र हा एनसीबीचा अधिकारी नसल्याचे दिल्ली एनसीबीने स्पष्ट केले. या व्यक्तीचा एनसीबीशी कोणताच संबंध नाही. मग ही व्यक्ती कोण आहे हा प्रश्न आहे. मग ही व्यक्ती आर्यन खानला फरफटत एनसीबी कार्यालयात कसे काय घेऊन जात होता हे एनसीबीला सांगावे लागेल, असे मलिक म्हणाले.

मात्र या व्यक्तीचीही माहिती आम्ही काढली असून गोसावी क्लेम करतो की तो खासगी गुप्तहेर आहे .  गोसावी फ्रॉड आहे. गोसावीवर पुण्यात गुन्हा दाखल झालेला आहे. फेसबुकवर एनसीबीचे अधिकारी वानखेडे यांच्यासोबत सोबत त्याचा फोटो होता मात्र  रविवारनंतरत्याने तो काढून टाकला. हा गोसावी  पोलिसांच्या गाड्या घेऊन फिरतो हत्यारे घेऊन फोटो काढतो, अशी माहितीही  नवाब मलिक यांनी पत्रकार परिषदेत दिली.

सरकारच्या बदनामीचा प्रयत्न , भाजपवर थेट आरोप

भारतीय जनता पक्ष संपूर्ण एनसीबीचे कार्यालयाचा उपयोग लोकांना बदनाम करण्यासाठी करत आहे. आपल्या नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना छापेमारी करण्याच्या कामी वापर करत आहे. जो मनीष भानुशाली पंतप्रधान मोदी, गृहमंत्री शहा, नड्डा यांना थेट भेटतो त्याचे भाजपत पद काय आहे?, हा त्यांचा राष्ट्रीय उपाध्यक्ष आहे का? हे सांगावे. मनीष भानुशालीला भाजपने कोणती जबाबदारी दिली आहे याचाही खुलासा भाजपने केला पाहिजे. गेल्या १ वर्षांपासून भारतीय जनता पक्ष हा महाराष्ट्राला, महाराष्ट्राच्या सरकारला आणि बॉलिवूडला बदनाम करण्याचे काम करत आहे, बनावट छापे मारत आहे आणि ३ तारखेचा सगळा ड्रामा हा बनावट आहे आणि असा थेट आरोप नवाब मलिक यांनी केला आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!