Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

MumbaiNCBNewsUpdate : आर्यन खान, अरबाज मर्चंट आणि इतर ६ जणांची न्यायालयीन कोठडीत रवानगी

Spread the love

मुंबई : बहुचर्चित  क्रूझवर ड्रग्ज पार्टी केल्याच्या आरोपावरून एनसीबीने अटक केलेल्या आर्यन खान, अरबाज मर्चंट आणि इतर ६ जणांची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली आहे. या सर्वांची न्यायालयीन कोठडी आज संपत असल्याने आज त्यांना मुंबईतील न्यायालयात हजर करण्यात आले होते. एनसीबीने आज पुन्हा या सर्वांना ११ ऑक्टोंबर पर्यंत कोठडी मागितली होती. मात्र, सुनावणीअखेर न्यायालयाने या सर्वांची न्यायालयीन कोठडीत पाठवले. 

दरम्यान आर्यन, अरबाज मर्चंट यांच्या जामिनासाठी अर्ज दाखल करण्यात आले मात्र, न्यायालयाची वेळ संपल्यामुळे या अर्जावर आज सुनावणी होऊ शकली नाही. त्यामुळे आर्यनला आजची रात्र न्यायालयीन कोठडीतच काढावी लागणार आहे.  या प्रकरणात आणखी तपास गरजेचा आहे. चौकशीच्या आधारावर, गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन कोठडी आवश्यक आहे, हा वकिलांचा युक्तिवाद न्यायालयाने ग्राह्य धरला.  इतर आरोपींमध्ये मुनमुन धमेचा, नुपूर सतिजा, इशमीत सिंग, मोहक जैस्वाल, विक्रांत छोकर, गोमित चोप्रा यांचा समावेश असून  या सगळ्यांना १४ दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत पाठवण्यात आले  आहे.

न्यायालयात काय झाले ?

आर्यनचे वकील सतीश मानेशिंदे यांनी न्यायालयात नाराजी व्यक्त केली. “आर्यनच्या विधानानुसार त्याला अटक करण्यात आली आणि गेटवरुन ताब्यात घेण्यात आले. त्याची अधिकाऱ्यांबाबत कोणतीही तक्रार नाही. या प्रकरणात पहिल्या दिवशी, मी रिमांडसाठी तत्काळ सहमत झालो होतो. विचार केला की तपासात काही विकास होईल. मात्र काही अटके व्यतिरिक्त या प्रकरणात आणखी काही घडले नाही. काल, जेव्हा अर्चित कुमारला झाली तेव्हा त्यांनी मर्चंट आणि खान यांचा याच्याशी संबंध आहे की हे तपासायला पाहीजे होते. मात्र असे झाले नाही.”, असे  मानेशिंदे आर्यनची बाजू मांडतांना न्यायालयात म्हणाले.

दरम्यान, ४ ऑक्टोबर रोजी एनसीबीने न्यायालयाला सांगितले होते की, आर्यन कोडवर्डमध्ये चॅट करत असे आणि हे डीकोड करण्यासाठी त्याची कोठडी आवश्यक आहे. त्याच्या अनेक चॅटमधून त्याचे डीलर्सशी संबंध असल्याचे उघड होते. तसेच आंतरराष्ट्रीय व्यवहार झाल्याचे देखील स्पष्ट होत आहे. आरोपींनी ड्रग्स पॅडलरशी व्यवहार करण्यासाठी कोडवर्डचा वापर केला आहे. अशा परिस्थितीत आरोपींना रिमांडमध्ये समोरासमोर चौकशी करण्याची गरज आहे. न्यायालयात झालेल्या सुनावणीदरम्यान आर्यन खानने त्या दिवशी घडलेला घटनाक्रम सांगितला आहे. तसेच, आपला याच्याशी काहीही संबंध नसल्याचा दावा आर्यन खानने  केला आहे.

तपासात कोणतीही प्रगती नाही

आजच्या सुनावणीमध्ये आर्यन खाननं आपली बाजू मांडताना अनेक दावे देखील केले आहे. अर्थात, न्यायालयीन प्रक्रियेनंतरच त्यातील सत्यासत्यता समोर येऊ शकेल. न्यायालयात आर्यन खानने  वकील सतीश मानेशिंदे यांच्या माध्यमातून आपली भूमिका मांडली. “मला प्रतीक गाबा नावाच्या एका मित्राने पार्टीसाठी बोलावलं होतं. त्यानेच सगळं कोऑर्डिनेट केले  होते . मी बॉलिवुडमध्ये आहे म्हणून कदाचित मला तिथे ग्लॅमरसाठी बोलावण्यात आलं असावे ”, असे  आर्यनने  आपल्या खुलाशात म्हटले आहे.

आर्यन म्हणाला कि , “२ ऑक्टोबरला आम्हाला ताब्यात घेतल्यापासून या तपासात कोणतीही प्रगती झालेली नाही. मी सुरुवातीला एक दिवसाच्या रिमांडसाठी स्वत:हून तयार झालो. दुसऱ्यावेळी त्यांनी ७ दिवसांची कस्टडी मागितली. आम्हाला वाटलं की तपास पुढे सरकेल, पण काहीही झालं नाही”, असे  आर्यनने त्याचे  वकील सतीश मानेशिंदे यांच्या माध्यमातून कोर्टाला सांगितले.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!