MumbaiNewsUpdate : एमपीएससीच्या परीक्षेला जाताय ? हॉल तिकीट दाखवा आणि बिनधास्त लोकलने जा…
मुंबई : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या ४ सप्टेंबर रोजी होणाऱ्या परीक्षेसाठी उमेदवारांना उपनगरी लोकल गाड्यांमधून प्रवास करण्याची मुभा देण्यात येणार आहे. या संदर्भात काही विद्यार्थ्यांनी भाजप आमदार आशीष शेलार यांच्याकडे हा प्रश्न मांडल्यावर त्यांनी रेल्वे राज्य मंत्री रावसाहेब दानवे यांच्याशी संपर्क साधला. तेव्हा त्यांनी राज्य सरकारकडून प्रस्ताव आल्यास रेल्वेकडून कोणतीही अडचण नसल्याचे सांगितले. त्यामुळे ही बाब लगेच मुख्य सचिव सीताराम कुंटे यांच्या निदर्शनास आणून दिल्यावर त्यांनीही प्रस्ताव पाठविण्याची तयारी दाखविली. त्यामुळे आता परीक्षेचे प्रवेश पत्र दाखवून विद्यार्थ्यांना तिकीट मिळेल व प्रवास करता येईल, असे शेलार यांनी सांगितले.