Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

MaharashtraRainUpdate : मराठवाडा , विदर्भासह पुढील चार दिवस जोरदार पावसाचा अंदाज

Spread the love

पुणे : राज्याच्या काही भागात उद्यापासून चार दिवस पाऊस पडेल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. त्यामुळे उद्यापासून म्हणजेच ३० ऑगस्टपासून रोजी पावसाचा जोर वाढणार असून परभणी, नाशिक, ठाणे, रायगडसह पालघर जिल्ह्यात ऑरेंज अ‍ॅलर्ट देण्यात आला आहे. मराठवाड्यासह विदर्भातही पावसाच्या सरी बरसण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

हवामान खात्याने बंगालच्या उपसागरात तयार होण्याऱ्या कमी दाबाचे क्षेत्र, त्याचा पश्चिम व मध्य भारतातून प्रवासाची शक्यतेमुळे महाराष्ट्र राज्यात येत्या चार ते पाच दिवसात काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

दोनच दिवसांपूर्वी सरासरीखाली असणारे राज्यातील दिवसाचे कमाल तापमान आता सरासरीपुढे गेले असून, काही ठिकाणी ते सरासरीपेक्षा ४ ते ५ अंशांनी वाढले आहे. त्यामुळे उन्हाचा चटका आणि उकाडय़ातही अचानक वाढ झाली आहे. ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यापासून राज्यात सर्वत्र पावसाळी स्थिती निर्माण झाली होती. दुसऱ्या आणि तिसऱ्या आठवड्यापर्यंत अनेक भागात कमी-अधिक प्रमाणात पावसाची हजेरी होती.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!