Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

CoronaMaharshtraUpdate : सावधान !! महाराष्ट्रातील काही जिल्ह्यात वाढतो आहे संसर्ग , गरज पडल्यास रात्रीची संचारबंदी

Spread the love

मुंबई : गेल्या २४ तासात राज्यात ४ हजार ६६६ नवीन करोनाबाधित आढळून आले असून, १३१ रूग्णांचा मृत्यू झाल्याची देखील नोंद झाली आहे. तर, ३ हजार ५१० रूग्ण करोनातून बरे झाले आहेत. दरम्यान राज्यात आता पुन्हा एकदा कोरोनाबाधितांची संख्या वाढत असल्याचे आढळून येत आहे. शिवाय, कोरोनाबाधितांच्या मृत्यूतही वाढ होत आहे. त्यामुळे राज्यावरील कोरोना संकटाचा धोका अद्याप टळलेला नाही, हे यावरून दिसून येत आहे. राज्य शासनाकडून निर्बंध शिथिल करण्यात आलेले असल्याने, सर्वच ठिकाणी मोठ्याप्रमाणावर गर्दी दिसून येत आहे. परिणामी रूग्ण संख्येत वाढ सुरू आहे.

दरम्यान राज्यात आजपर्यंत एकूण ६२,६३,४१६ करोनाबाधित रूग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. यामुळे राज्यातील रूग्ण बरे होण्याचे प्रमाण (रिकव्हरी रेट) ९७ टक्के एवढे झाले आहे. राज्यातील करोनाबाधितांची एकूण संख्या ६४,५६९३९ झाली आहे. राज्यात १३७१५७ करोनाबाधित रूग्णांचा आजपर्यंत मृत्यू झाला. तर, सध्या राज्यातील मृत्यू दर २.१२ टक्के एवढा आहे. तर आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ५,३६,५९,६१३ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ६४,५६,९३९ (१२.०३ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात २,९१,५२२ व्यक्ती गृहविलगीकरणात आहेत, तर २ हजार ३१५ व्यक्ती संस्थात्मक विलगीकरणात आहेत.राज्यात आज रोजी एकूण ५२,८४४ अॅक्टिव्ह रूग्ण आहेत.

केरळनंतर महाराष्ट्रात वाढताहेत रुग्ण

केरळबरोबरच दुसऱ्या क्रमांकाची दैनंदिन रुग्णवाढ महाराष्ट्रात होत असून ज्या भागात कोरोनाचा संसर्ग वाढत आहे त्या भागात रात्रीची संचारबंदी लागू करण्याची सूचना केंद्राने गुरुवारी केली होती. त्याबाबत आता राज्य सरकार विचाराधीन असल्याची माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. केंद्र सरकारने केलेल्या सूचनांची अंमलबजावणी राज्य सरकार नक्की करेल असे आरोग्यमंत्र्यांनी म्हटले आहे. तसेच “राज्यातील सणांच्या पार्श्वभूमीवर याबाबत काळजी घेणे महत्त्वाचे आहे. केंद्र सरकारने दिलेल्या सूचनांची अंमलबजावणी राज्य सरकार करेल,” असे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी म्हटले आहे.

दरम्यान, केरळमध्ये रुग्णसंख्येत वाढ कायम दिसून येत आहे. शनिवारी दिवसभरात सापडलेल्या एकूण रुग्णांपैकी ३१ हजार २६५ करोनाबाधित एकट्या केरळ राज्यातील आहेत. तसेच १५३ राज्यात १५३ जणांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. केरळमध्ये गेल्या काही दिवसांपासून ३० हजारांपेक्षा अधिक रुग्ण आढळत आहेत.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!