Maharashtranewsupdate : डॉ. गणेश चंदनशिवे यांना पदमश्री डॉ. विट्टलराव विखे पाटील कला गौरव पुरस्कार

अहमदनगर : राज्यातील ज्येष्ठ लोककलावंत लोकशाहीर, लोककलेचे अभ्यासक आणि बाजीराव मस्तानी , तानाजी द अनसंग वारीअर अश्या अनेक चित्रपटांत पार्श्वगायन करणारे आणि मुंबई विद्यापीठाच्या लोककला अकादमीचे प्रमुख डॉ गणेश चंदनशिवे यांना पदमश्री डॉ. विट्टलराव विखे पाटील फाऊंडेशन तर्फे देण्यात येणारा कलागौरव पुरस्कार देण्यात येणार असल्याची जाहीर झाला असून या पुरस्कारा घोषणा फाउंडेशनच्या निवड समितीचे अध्यक्ष डॉ. रावसाहेब कसबे यांनी केली आहे.पदमश्री डॉ.विट्टलराव विखे पाटील यांच्या जयंती निमित्ताने विखे फाउंडेशन तर्फे साहित्य पुरस्कार देण्यात येतात . हे या पुरस्काराचे ३१ वे वर्ष आहे. या पुरस्काराचे स्वरूप २५ हजार रुपये व स्मृतिचिन्ह असे असणार आहे.
याशिवाय पद्मश्री डॉ. विखे पाटील नाट्यसेवा पुरस्कार पुणे येथील धर्मकीर्ती सुमंत यांना तर समाजप्रबोधन पुरस्कार साधनाचे संपादक पाथर्डी येथील विनोद शिरसाठ , लोकसाहित्याच्या ज्येष्ठ अभ्यासक-समीक्षक डॉ. तारा भवाळकर, दिनकर मनवर , सुरेश पाटील , धर्मकीर्ती सुमंत , गणेश चंदनशिवे, अशोक लिंबेकर, अशोक महाराज निर्मळ तर डॉ. सोमनाथ मुटकुळे यांच्या हस्ते ‘पुन्हा क्रांतिज्योती’ या एकपात्री नाटकास जिल्हा विशेष पुरस्कार देण्यात येणार आहे. या निवड समितीमध्ये डॉ. रावसाहेब कसबे, डॉ. एकनाथ पगार, प्राचार्य डॉ. दिलीप धोंडगे व डॉ. राजेंद्र सलालकर यांचा समावेश होता.