Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

WorldNewsLatestUpdate : अफगाणिस्तावर अखेर तालिबान्यांचा झेंडा , जाणून घ्या एका क्लिकमध्ये सर्व ताज्या घडामोडी

Spread the love

काबुल : अमेरिकेचे नूतन राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी अफगाणिस्तानमधून आपले सैन्य परत घेण्याचा निर्णय १४ एप्रिलला जाहीर केल्या नंतर बरोबर अवघ्या पाच महिन्याच्या १४ ऑगस्टला अफगाणिस्तानवर पूर्णपणे ताबा मिळवला आहे. सत्तेतून पायउतार झाल्यानंतर तालिबानने २० वर्षानंतर पुन्हा तालिबानने अफगाणिस्तानवर एकदा विजय मिळवला आहे.

 

रविवारी तालिबानने काबूल ताब्यात घेतले आणि अफगाणिस्तानमध्ये सत्तांतर झाले. राष्ट्रपती अशरफ गनी आणि त्यांच्या सहकाऱ्यांना देश सोडून जावे लागले. त्यामुळे तालिबान आता सत्ता चालवण्यासाठी आपल्या नेत्यांची घोषणा करण्याची शक्यता आहे.

भारतीयांना घेऊन एअर इंडियाचे विमान सुखरूप परतले

काबूल : अफगाणिस्तानमध्ये घडणाऱ्या धक्कादायक घटनांकडे सर्व जगाचे लक्ष वेधले असून अफगाणिस्तानमधील काबूलहून  अधिक जागांवर तालिबानने कब्जा केला आहे. दरम्यान  अफगाणिस्तानचे राष्ट्रपीत अशरफ गनी देश सोडून गेल्यामुळे अफगाणिस्तान सोडण्यासाठी विदेशी नागरिकांनी विमानतळावर मोठी गर्दी केली असून या ठिकाणीही मोठ्या प्रमाणात गोळीबार चालू असल्याने दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

उपलब्ध माहितीनुसार सध्या काबूल इंटरनॅशनल एयरपोर्टवर  कमर्शियल फ्लाईट्सची उड्डाणे थांबवण्यात आली आहेत. सर्वत्र भीतीदायक वातावरण निर्माण झाल्याने  मोठ्या संख्येने  नागरिक देश सोडण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र आता विमानांची उड्डाणे  थांबवण्यात आल्याने  नागरिक आतमध्येच अडकून विमानतळातच अडकून पडली आहेत.
दरम्यान अफगाणिस्तानला पुन्हा इस्लामिक इमिरेट्स ऑफ अफगाणिस्तान (आयइए) जाहीर करण्याची तयारी तालिबानने सुरु केली आहे.

दरम्यान भारतातील दूतावासात काम करणाऱ्या  कर्मचाऱ्यांसहीत अफगाणिस्तानात राहणाऱ्या १२९ भारतीय आणि इतर प्रवाशांना घेऊन एअर इंडियाचे  एक विशेष विमान भारतात परतले आहे. भारताने अफगाणिस्तानमधील  आपले दूतावास बंद केले आहे. भारतासह इतर देशांनीही अफगाणिस्तानमधील आपले दूतावास बंद करुन कर्मचाऱ्यांना आपापल्या देशात पार्ट नेण्याची तयारी सुरु केली आहे.

 

कोण आहेत तालिबानचे मुख्य सूत्रधार?

तालिबानच्या सूत्रधारांमध्ये मुल्ला अब्दुल गनी बरादर , हिबतुल्लाह अखुंदजादा, मुल्ला मोहम्मद याकूब, सिराजुद्दीन हक्कानी, सिराजुद्दीन हक्कानी यांचा समावेश असून नव्या तालिबानचा प्रमुख म्हणून मुल्ला अब्दुल गनी बरादरच्या नावाची चर्चा असल्याचे सांगितले जात आहे. बरादर तालिबानच्या राजकीय कार्यालयाचे प्रमुख आहेत. त्याशिवाय तालिबानच्या शांतता चर्चेच्या शिष्टमंडळातही बरादरचा समावेश होता. मुल्ला ओमरच्या विश्वासूंपैकी एक असलेल्या अब्दुल गनी बरादरला २०१० मध्ये कराचीमध्ये सुरक्षा दलांनी अटक केली होती. त्यानंतर तालिबानमध्ये झालेल्या चर्चेनंतर पाकिस्तान सरकारने २०१८ मध्ये त्याची सुटका केली होती.

भारताविषयीतालिबानची भूमिका

एका भारतीय वृत्त वाहिनीशी बोलताना तालिबानचा प्रवक्ता झैबुल्लाह मुजाहिद म्हणाला की, आम्हाला भारतासोबत चांगले आणि मजबूत संबंध हवे आहेत. सर्व भारतीय येथे सुरक्षित असतील. कोणालाही देश सोडण्याची गरज नाही. भारत -पाकिस्तानच्या संघर्षावर आम्हाला काहीही काही बोलायचे नाही.
भारत आणि पाकिस्तानाच्या वादात हस्तक्षेप करायचा नाही आहे. दोन्ही देशांना त्यांच्या समस्या आहेत. यामध्ये तालिबान कोणतीही भूमिका बजावणार नाही.
दरम्यान तालिबान लवकरच संपूर्ण अफगाणिस्तानवर आपल्या राज्याची औपचारिक घोषणा करणार असल्याचे वृत्त आहे. . हा दहशतवादी समूह राष्ट्रपती भवनातून लवकरचइस्लामिक एमिरेट ऑफ अफगानिस्तानची घोषणा करणार असल्याचे एपी या वृत्तसंस्थेने तालिबानच्या एका नेत्याच्या हवाल्याने म्हटले आहे. तालिबानची राजवट असताना सप्टेंबर २००१ पर्यंत हेच देशाचे नाव होते.

https://www.facebook.com/ashrafghani.af/posts/10158951684383292

राष्ट्रपती अशरफ गनी यांची फेसबुक पोस्ट

अफगाणिस्तानचे राष्ट्रपती अशरफ गनी यांनी देश सोडल्यानंतर स्वतः फेसबुकच्या पोस्टद्वारे अफगाणिस्तानातील घटनांचा अधिकृत खुलासा केला आहे. या खुलाशात अशरफ गनी यांनी म्हटले आहे कि, अफगाणिस्तानची राजधानी काबूलमध्ये तालिबानने  प्रवेश केल्यानंतर आपण होणाऱ्या रक्तपातापासून वाचण्यासाठी देशसोडण्याचा निर्णय घेतला .  एका कठिण निर्णयाचा सामना करावा लागला. ज्यात २० वर्षांच्या युद्धानंतर लाखो काबूल रहिवाशांचे भवितव्य आणि शहराची सुरक्षा धोक्यात आली होती. ज्यात अगोदरच असंख्य लोक मारले गेले होते. त्यामुळे लोकांना रक्तपातापासून वाचण्यासाठी मी विचार केला की देश सोडणे  हा एकमेव पर्याय असेल.

अमेरिकन सैन्याचे तालिबान्यांना प्रत्युत्तर

काबुल विमानतळावर तालिबान्यांकडून विमानतळावर होत असलेल्या  अमेरिकन सैन्यांनी देखील प्रत्युत्तर दिले  आहे. ज्या महिलांनी हिजाब टाळल्याचे दिसले अशा महिलांवर हा गोळीबार करण्यात आला असल्याचे वृत्त आहे. अमेरिकेकडून विमानतळावर ६ हजारांहून अधिक सैनिक तैनात करणार असल्याचे  म्हटले आहे. हे सैनिक तैनात केल्यामुले  नागरिक सुरक्षितपणे अफगाणिस्तान बाहेर  पडू शकतील. सध्या काबूल विमानतळावरील परिस्थिती अत्यंत गंभीर आहे.
तालिबानने  काबूलवर  कब्जा केल्यानंतर संपूर्ण शहरात पांढरे  तालिबानी झेंडे दिसत आहेत. तालिबानी नेता सोशल मीडियावर जास्त सक्रिय दिसत असून ते शांततेचा संदेश देण्याचा प्रयत्न करत आहेत. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, तालिबानी नेता मुल्ला बरादर आपल्या साथीदारांसोबत आज काबूलमध्ये दाखल होईल. सध्या मुल्ला बरादर हा कतारमध्ये असल्याचे सांगितले जात आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!