Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

WorldNewsUpdate : मोठी बातमी : अफगाणिस्तानवर तालिबान्यांचा संपूर्ण कब्जा , राष्ट्रपती अशरफ गनी यांचा राजीनामा

Spread the love

काबुल : अफगाणिस्तानचे राष्ट्रपती अशरफ गनी यांनी राजीनामा दिला असून गनी तजागीस्तानला रवाना झाले असल्याचे वृ्त्त टोलो या अफगानी वृत्तसंस्थेने दिले आहे. एका मंत्र्याने हि माहिती रॉयटरला दिली असून तालिबानचे एक शिष्टमंडळ राष्ट्रपती भवनाकडे सत्ता हस्तांतरणाची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी जात असल्याचे वृत्त दिले आहे. तालिबान्यांनी अफगाणिस्तानची राजधानी काबूलमध्ये शिरकाव केल्यानंतर आता सत्ता ताब्यात घेतल्याची घोषणा करण्याची औपचारिकता शिल्लक असल्याचे सांगितले जात आहे.

या सर्व प्रकरणात अमेरिकेचे माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेचे विद्यमान अध्यक्ष जो बाडेन यांच्यावर तीव्र शबदात टीका आलेली असून अमेरिकेने आपले सैन्य माघारी घेतल्यामुळेच तालिबान्यांची हिम्मत वाढली असे म्हटले आहे. आता अमेरिकेतील जनतेला आपली आठवण येत असेल असेही त्यांनी आपल्या प्रवक्त्याच्या मार्फत म्हटले आहे. तालिबानने तब्बल २० वर्षांनंतर पुन्हा एकदा काबुलवर आपली सत्ता प्रस्थापित केली. २००१ मध्ये अमेरिकेच्या हल्ल्यानंतर तालिबानला काबुल सोडून पळ ठोकावा लागला होता. आता मात्र अमेरिकेने आपले सैन्य परत घेतल्यामुळे याला अमेरिकाच जबाबदार असल्याचे प्रतिपादन राष्ट्रपती अशरफ गनी यांनी काही दिवसांपूर्वीच केले होते.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, तालिबानमधील दुसऱ्या क्रमांकाचे नेते मु्ल्ला बरादर हे राष्ट्रपती अशरफ गनी यांच्यासोबत चर्चा करत आहे. या चर्चेनंतर अली अहमद जलाली यांच्याकडे गनी सत्ता सोपवणार असल्याचे म्हटले जात आहे. दरम्यान तालिबानसमोर अफगाणिस्तान सरकारने शरणागती पत्करली असल्याचे वृत्त समोर आले आहे. तालिबानने सत्ता हस्तांतरणाची मागणी केली आहे. तालिबानची ही मागणी कार्यवाहक गृह मंत्री अब्दुल सत्तार मिर्जकवाल यांनी मान्य केल्याचे वृत्त आहे.

अफगाणिस्तानमधील टोलो न्यूजने दिलेल्या वृत्तानुसार, गृहमंत्री अब्दुल सत्तार मिर्जकवाल यांनी म्हटले की, काबूलवर हल्ला होणार नाही. सत्तांतर शांततेने होणार आहे. काबूलच्या सुरक्षितेची जबाबदारी सुरक्षा दलाकडे आहे.राष्ट्रपती अशरफ गनी यांनी शनिवारी देशाला उद्देशून भाषण केले होते. या भाषणात त्यांनी तालिबानचा प्रतिकार करण्याचे संकेत दिले होते. मागील २० वर्षात अफगाणिस्तानने मिळवलेल्या यशावर पाणी सोडणार नसल्याचे त्यांनी म्हटले होते. त्यामुळे काबूलच्या सीमेवर तालिबानींसोबत संघर्ष निर्माण होईल अशी शक्यता वर्तवण्यात येत होती. मात्र, ही शक्यता फोल ठरली.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!