Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

EducationNewsUpdate : FYJC CET 2021 : ११ वीच्या प्रवेशासाठीच्या सीईटीसाठी “अशी” करा नोंदणी

Spread the love

मुंबई : दहावी पास झालेल्या विद्यार्थ्यांसाठी अकरावीच्या प्रवेशासाठी जाहीर करण्यात आलेल्या सीईटी परीक्षेची नोंदणी कालपासून सुरू झाली आहे. दरम्यान यासाठी तयार करण्यात आलेल्या वेबसाईटवर विद्यार्थ्यांनी बैठक क्रमांक टाकल्यावर तेथे येणारी गुणपत्रिका आणि मूळ गुणपत्रिकेची जुळवाजुळव होत नसल्याने विद्यार्थी त्रस्त झाले होते. मात्र  आता सदर वेबसाईट सुरळीत झाली असल्याची माहिती देण्यात आली आहे.


शिक्षण विभागाने दिलेल्या माहितीनुसार महाराष्ट्र अकरावी प्रवेशासाठीच्या सीईटीसाठी   cet-mh-ssc.ac.in  या लिंकवरून नोंदणी करता येईल.  या परीक्षेसाठी १०० गुणांची प्रश्नपत्रिका असेल आणि परीक्षेचा कालावधी दोन तासांचा असेल. २१ ऑगस्ट २०२१ रोजी राज्यभरात कोविड १९ च्या नियमांसह परीक्षा होणार आहे. प्रवेश परीक्षा सकाळी ११ ते दुपारी १ या वेळेत घेण्यात येईल.

या अर्जाची नोंदणी अशी करा

अकरावीच्या प्रवेशाच्या हेतूने विद्यार्थ्यांसाठी सीईटी परीक्षेचे आयोजन करण्यात आले आहे. पण ती केवळ विद्यार्थ्यांसाठी पर्यायी अर्थात ऐच्छिक परीक्षा असणार आहे.

सीईटी परीक्षेची नोंदणी करण्यासाठी

सर्वप्रथम महाराष्ट्र FYJC CET 2021 ची अधिकृत वेबसाइट cet-mh-ssc.ac.in वर जा.

  • ड्रॉप डाउन मेनूमध्ये आपला बोर्ड निवडा
  • नोंदणीसाठी नाव, संपर्क क्रमांक, जन्म तारीख, पत्ता आणि शिक्षणाचे माध्यम यासारख्या आवश्यक सर्व माहिती भरा..
  • त्यानंतर जिल्हा व तालुका निवडून परीक्षा केंद्राचा तपशील निवडा.
  • फोटो, स्वाक्षरी, आयडी प्रूफ आणि काही दिव्यांग असल्यास त्याचे सर्टिफिकेट अपलोड करा.
  • इतर सर्व औपचारिकता पूर्ण करा आणि सबमिट वर क्लिक करा.
  • खात्रीसाठी महाराष्ट्र एफवायजेसी सीईटी २०२१ च्या अर्जाची एक प्रिंट आउट घ्या.

अशी असेल  परीक्षा

सदर परीक्षा राज्य मंडळाच्या दहावी अभ्यासक्रमावर आधारित असेल.
या परीक्षेसाठी १०० गुणांची प्रश्नपत्रिका असेल आणि परीक्षेचा कालावधी दोन तासांचा असेल.
या परीक्षेची प्रश्नपत्रिका आठ माध्यमातून उपलब्ध होतील.
ही परीक्षा ऑफलाईन स्वरुपाची असेल आणि प्रश्नपत्रिकेत वस्तुनिष्ठ प्रकारचे बहुपर्यायी प्रश्न असतील.
सीईटी २०२१ च्या परीक्षेसाठीची अर्ज भरण्यासाठी सविस्तर सूचना मंडळाच्या वेबसाइटवर उपलब्ध आहेत. लिंकद्वारे महाराष्ट्र एफवायजेसी सीईटी फॉर्म भरण्याची सुविधा २६ जुलै २०२१ पर्यंत आहे. सीईटी २०२१ फॉर्म लिंकवर अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाइटवर तपासणी करत रहा.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!