Maharashtra HSC exam Result 2024: बारावीत यंदाही मुलींचीच बाजी , छत्रपती संभाजीनगरच्या मुलीला 100 टक्के गुण !!

मुंबई : महाराष्ट्र राज्य बारावीचा निकाल आज जाहीर करण्यात आला. यंदा बारावीचा निकाल 93.37 टक्के लागला आहे. यंदाही निकालात कोकण विभागाने बाजी मारली आहे. 91.51 टक्के निकालासह कोकण विभाग सर्वप्रथम ठरला आहे. तर 91.95 टक्क्यांसह मुंबई विभाग सर्वात मागे आहे. यंदाही बारावीच्या निकालात मुली आघाडीवर आहेत. यात उत्तीर्ण मुलींची टक्केवारी 95.44 टक्के आहे तर मुलांच्या निकालाची टक्कवारी 91.60 टक्के आहे.
कोकण विभागाचा निकाल 97. 51 टक्के तर मुंबईचा निकाल 91.95 टक्के लागला आहे. यंदाही बारावीच्या निकालामध्ये मुलांपेक्षा मुली अग्रेसर आहेत. यावर्षी 95.44 टक्के मुली उत्तीर्ण झाल्या आहेत. तर उत्तीर्ण होणाऱ्या मुलांचं प्रमाण 91.60 टक्के आहे. म्हणजे परीक्षा देणाऱ्या मुलांपेक्षा 3.84 टक्के अधिक मुली उत्तीर्ण झाल्या आहेत.
छत्रपती संभाजीनगरच्या मुलीला 100 टक्के गुण
महाराष्ट्रातील छत्रपती संभाजीनगरमध्ये राहणाऱ्या मुलीला बारावीच्या परीक्षेत 100 टक्के गुण मिळाले आहे. रेणुका बोरमणीकर असे या विद्यार्थीनीचे नाव आहे. देवगिरी महाविद्यालयात ती वाणिज्य शाखेत शिक्षण घेत होती. विशेष म्हणजे राज्यातील 8782 मुलांना 90 टक्के गुण मिळाले, अशी माहिती राज्य मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी दिली.
दरम्यान बारावी परीक्षेचा निकाल बोर्डाच्या वेबसाईटवर जाहीर झाल्यानंतर mahresult.nic.in ही बोर्डाची वेबसाईट पहिल्या मिनिटापासून डाऊन झाली. विद्यार्थी आणि पालकांनी बारावीचा निकाल पाहण्यासाठी या वेबसाईटवर अक्षरश: उड्या घेतल्या. मात्र ही वेबसाईटच ओपन होत नसल्याचा अनुभव आला. यानंतर पाच मिनिटांनी ही वेबसाईट पुन्हा सुरु झाली.
बारावीचा निकाल इथे पाहा…
mahresult.nic.in
http://hscresult.mkcl.org
www.mahahsscboard.in
https://results.digilocker.gov.in
http://results.targetpublications.org
संभाजीनगर, लातूर विभागाचा निकाल काय?
या वर्षी एकूण 14 लाख 23 हजार 970 विद्यार्थ्यांनी इयत्ता बारावीची परीक्षा दिली होती. यातील 13 लाख 29 हजार 684 विद्यार्थी पास झाले आहेत. यावेळी मराठवाड्यातील छत्रपती संभाजी नगर विभागातील एकूण 94.08 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. तर लातूर विभागाचा 92.36 टक्के निकाल लागला आहे.
यावर्षी किती विद्यार्थी परीक्षेला बसले?
यंदाच्या बारावीच्या परीक्षेला राज्यातील पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळांमधून विज्ञान, कला, वाणिज्य, व्यवसाय अभ्यासक्रम व आय.टी.आय. या शाखांसाठी एकूण 14 लाख 33 हजार 371 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी साधारण 14 लाख 23 हजार 970 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. यातील एकूण 13 लाख 29 हजार 684 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. निकालाची ही टक्केवारी 93.37 टक्के आहे.
नऊ विभागीय मंडळाचे निकाल
पुणे- 94.44 टक्के
नागपूर- 92.12 टक्के
छत्रपती संभाजीनगर- 94.08 टक्के
मुंबई- 91.95 टक्के
कोल्हापूर- 94.24 टक्के
अमरावती- 93 टक्के
नाशिक- 94.71 टक्के
लातूर- 92.36 टक्के
कोकण- 97.51 टक्के